मुंबई : Google चा स्क्रीन-फ्री फिटनेस ट्रॅकर Fitbit Air जागतिक पदार्पणानंतर आता भारतात दाखल होणार आहे. हे डिव्हाइस 2 ऑक्टोबर रोजी भारतात लॉन्च होण्याची शक्यता असून, अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच ते Flipkart वर सूचीबद्ध झाल्याची माहिती समोर आली आहे. लिस्टिंगनुसार, Fitbit Air ची किंमत ₹13,999 असून काळा, लाल आणि निळा असे रंगांचे पर्याय उपलब्ध असतील. (Google Fitbit Air)
ॲमेझफिटने लांब पल्ल्याच्या मैदानी खेळांसाठी आणि साहसी मोहिमांसाठी डिझाइन केलेले 'टी-रेक्स ड्युअल सोलर' (Amazfit T-Rex Dual Solar) हे एक मजबूत आणि अत्याधुनिक ...
24 तास आरोग्य निरीक्षणावर भर
Fitbit Air हे पारंपरिक स्मार्टवॉचपेक्षा वेगळे असून, स्क्रीनशिवाय सतत आरोग्य निरीक्षणावर भर देते. या ट्रॅकरमध्ये हार्ट रेट, SpO2 आणि त्वचेच्या तापमानाचे सेन्सर्स देण्यात आले आहेत. डिव्हाइस Google Health ॲपशी कनेक्ट होऊन वापरकर्त्यांना आरोग्यविषयक माहिती आणि रिकव्हरीशी संबंधित टिप्स देईल. हे ॲप Android आणि iOS या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल. (Google Fitbit Air)
मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मानवी क्षमतांवर मात करेल, असा दावा करत एलॉन मस्क यांनी पुन्हा एकदा त्यासाठीची कालमर्यादा पुढे आणली आहे. 2027 च्या ...
7 दिवसांची बॅटरी आणि AI Coach
Fitbit Air ची बॅटरी 7 दिवसांपर्यंत टिकू शकते. यामध्ये फास्ट चार्जिंगची सुविधाही असून, फक्त 5 मिनिटांच्या चार्जिंगमधून दिवसभराचा वापर मिळू शकतो, असा दावा करण्यात आला आहे. ट्रॅकरच्या मुख्य आरोग्य सुविधांसाठी सबस्क्रिप्शन आवश्यक नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अधिक वैयक्तिक मार्गदर्शनासाठी Google पर्यायी AI Coach सुविधा देत आहे. (Google Fitbit Air)
Flipkart वरील लिस्टिंगमुळे भारतातील किंमत आणि रंगांची माहिती अधिकृत लॉन्चपूर्वीच समोर आली आहे. दरम्यान, विक्रेत्यांकडे 28 सप्टेंबरपर्यंत स्टॉक पोहोचण्याची अपेक्षा असून, भारतीय ग्राहकांना स्थानिक वॉरंटी कव्हरेज मिळण्याचीही माहिती आहे. (Google Fitbit Air)