Mumbai Water Cut : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ भागांत 24 तास पाणीपुरवठा विस्कळीत, 7 दिवस कमी दाबाने पाणी

मुंबई : एम पूर्व आणि एम पश्चिम विभागातील पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी तुर्भे निम्नस्तरीय जलाशय ते तुर्भे उच्चस्तरीय जलाशयादरम्यानचा जलबोगदा कार्यान्वित करण्याचे काम मुंबई महापालिकेकडून हाती घेण्यात आले आहे. (Mumbai Water Cut)


या कामासाठी 29 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून 30 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत म्हणजेच 24 तास पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे. त्यानंतर पुढील 7 दिवस काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. (Mumbai Water Cut)


महापालिकेने नागरिकांना आवश्यक पाणीसाठा करून ठेवण्याचे, पाण्याचा जपून वापर करण्याचे आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.



एम पूर्व विभागातील प्रभावित परिसर


लल्लूभाई संकुल, कमला रमणनगर, रमण मामा नगर, शिवाजीनगर, लोटस वसाहत, गौतमनगर, गायकवाड नगर, अयोध्या नगर, वाशीनाका, मानखुर्द, बेंगणवाडी, भारत नगर, म्हाडा इमारती, चिता कॅम्प, साठेनगर, झाकीर हुसेन नगर, देवनार गाव व वसाहत, नवीन भारत नगर, हशू आडवाणी नगर, नटवर पारेख संकुल, सह्याद्री नगर, वाढवली गाव, बीएआरसी वसाहत, रफिक नगर, मंडाळा गाव, नवीन मंडाळा, पद्मानगर, विष्णूनगर, एल.यू. गडकरी मार्ग, आर.एन.ए. पार्क, महाराष्ट्र नगर, इंडियन ऑइल नगर आणि बी.डी. पाटील मार्गावरील रिफायनरी विभाग आदी परिसरांचा समावेश आहे. (Mumbai Water Cut)



एम पश्चिम विभागातील प्रभावित परिसर


मैत्री पार्क, घाटला, चेंबूर गावठाण, सुभाष नगर, सुमन नगर, चिखलवाडी, आंबेडकर नगर, आनंद नगर, लालडोंगर, सिद्धार्थ वसाहत, स्वस्तिक पार्क, पोस्टल वसाहत, डब्ल्यू.टी. पाटील मार्ग, मुक्ती नगर, डायमंड उद्यान, सेंट्रल अव्हेन्यू, घाटला गाव, सुभाष नगर, चेंबूर कॅम्प, सिंधी कॅम्प, विजय विहार, भक्ती भवन, समर्थ नगर, गांधी बाजार, जनता मार्केट, इंदिरा नगर, गोल्फ क्लब, रामटेकडी, कोकण नगर, गणेश नगर, विजय नगर, अशोक नगर, सिंधी सोसायटी, आर.सी. मार्ग, माहूल गाव, आंबापाडा, वाशी नाका, जिजामाता नगर, जयहिंद नगर, बीपीसीएल, माझगाव डॉक, टाटा पॉवर, भक्ति पार्क, टिळक नगर, ठक्करबाप्पा वसाहत, पेस्तम सागर, सहकार नगर, श्रमजीवी नगर, पी.एल. लोखंडे मार्ग, रमाबाई वसाहत, अमीर बाग, मोतीलाल रहिवाशी संघ, कादरिया नगर, महात्मा फुले नगर, अजंठा वसाहत, मुकुंद नगर, पंजाबी चाळ, नागेवाडी आणि छेडा नगर आदी परिसर प्रभावित होणार आहेत. (Mumbai Water Cut)


Comments
Add Comment

Ganeshotsav 2026 : अनंत चतुर्दशीसाठी मुंबई महापालिकेची जय्यत तयारी; 25 हजारांहून अधिक कर्मचारी तैनात

मुंबई : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने व्यापक तयारी

Mira Bhayandar News: भटक्या श्वानांना खाद्य दिल्यास दंड; महापालिकेच्या निर्णयावर पशुसंवर्धन विभागाने मागवला रिपोर्ट

मीरा- भायंदर: मीरा- भायंदर महानगर पालिका क्षेत्रामधील श्वानप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी आहे. मीरा- भायंदर

Mumbai News: विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांसाठी तज्ज्ञ समितीच्या स्थापनेची मागणी, कोण होणार अध्यक्ष?

मुंबई: महाराष्ट्रातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी परिषदांच्या निवडणुका अधिक पारदर्शक, सुलभ

Mumbai Ganpati Visarjan: अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जनासाठी मुंबई महापालिका सज्ज, एका क्लिकवर पाहा कृत्रिम तलावांची यादी

मुंबई: अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे. मुंबई महापालिकेकडून

Navi Mumbai Accident: ट्रान्स हार्बर रेल्वे विस्कळीत, नवी मुंबईमध्ये रेल्वेचा भीषण अपघात; वाचा अपडेट

नवी मुंबई: उरण- बेलापूर रेल्वे मार्गिकेवर मोठी दुर्घटना घडली आहे. त्यामुळे ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गिका

Ganeshotsav 2026: गणेशभक्तांना दिलासा; विसर्जनाच्या दिवशी रात्रभर धावणार ॲक्वा लाईन मेट्रो, रेल्वेचंही जाणून घ्या अपडेट

मुंबई: मुंबई मेट्रो 3 ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर गणपती