Kolhapur Accident News : रेल्वे रुळावरून चालताना मोबाईलवर बोलणे आणि कानात इअरबड्स असणे एका १७ वर्षीय तरुणीच्या जीवावर बेतल्याची दुर्दैवी घटना कोल्हापुरातील हातकणंगले रेल्वे स्थानकाजवळ घडली. मागून येणाऱ्या धनबाद एक्स्प्रेसची (Dhanbad Express) धडक बसल्याने अनुष्का संतोष पोवार (वय १७, रा. इचलकरंजी) हिचा मृत्यू झाला. काल (ता 23) बुधवारी सकाळी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हातकणंगले येथील रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली.
कानातले इअरबड्स ठरले जीवघेणे
अनुष्का ही कोरोची येथे आरोग्य परिचरचे शिक्षण घेत होती. बुधवारी सकाळी ती दोन मैत्रिणींसोबत हातकणंगले ग्रामीण रुग्णालयाजवळ राहणाऱ्या मैत्रिणीला भेटण्यासाठी आली होती. सकाळी ११च्या सुमारास तिघी रुळाच्या बाजूने चालत होत्या. अनुष्का पुढे होती, तर तिच्या दोन मैत्रिणी वीस-तीस फूट अंतर मागे होत्या. रेल्वे येत असताना मैत्रिणी बाजूने ओरडत धावत अनुष्कापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होत्या.अनुष्काच्या कानात ब्लूटूथ इअरबड्स असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मागून येणाऱ्या रेल्वेचा आवाज किंवा मैत्रिणींनी दिलेला इशारा तिला ऐकू आला नसावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मैत्रिणींनी तिला सावध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रेल्वेची धडक बसल्याने अनुष्का गंभीर जखमी झाली.
एसीच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज मुंबई : मुंबईतील गोरेगाव पश्चिम परिसरात गुरुवारी सकाळी एका इमारतीच्या 8व्या मजल्यावरील घराला ...
अनुष्काचा मृतदेह ३० फूट हवेत उडाला
दरम्यान, इअरबड्स घालून रेल्वे रुळावरून चालत जात असलेल्या अनुष्का संतोष पोवार (वय १७, रा. इचलकरंजी) हिला धनबाद एक्स्प्रेसने धडक दिल्याने ती जागीच ठार झाली. अनुष्काचा मृतदेह ३० फूट हवेत उडाला. रक्ताचा सडा अंगावर उडाल्याने मैत्रिणी बेशुद्ध पडल्या. त्या शुद्धीवर आल्यावर अपघाताचे गूढ उकलले. हातकणंगले ग्रामीण रुग्णालयासमोर बुधवारी सकाळी ११ वाजता ही घटना घडली.
उपचारापूर्वीच मृत्यू
घटनेनंतर ग्रामीण रुग्णालयातील जीवरक्षक स्वप्निल नरुटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अनुष्काला तातडीने हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले; मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच हातकणंगले पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, शवविच्छेदनानंतर तो नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणाची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.






