मुंबई: महायुती सरकारमध्ये मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी दिवाळीच्या काळात किंवा दिवाळीनंतर राज्य मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. सरकार स्थापनेच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी अडीच-अडीच वर्षांचा शब्द दिला होता आणि आता त्याची वेळ आली असल्याचे कडू यांनी म्हटले.
Maharashtra Farmer News: शेतकऱ्यांना पीक विमा, कर्जमुक्तीसह शासनच्या योजनांचा लाभ प्राधान्याने देणार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती
मुंबई: "दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून, पीक विमा, ...
जळगाव दौऱ्यावर असताना प्रसारमाध्यमांशी बोलताना कडू यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाष्य केले. दिवाळीच्या काळात किंवा दिवाळी संपताच राज्यात मंत्रिमंडळ विस्तार आणि मोठा फेरबदल होण्याची दाट शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. सत्तावाटपाच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी अडीच-अडीच वर्षांचा शब्द दिला होता, आता ती वेळ आली आहे, असा दावा त्यांनी केला. पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याची मागणीही कडू यांनी केली. पाटील हे सलग तीन वेळा आमदार झाले असून, त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे, अशी मतदारसंघातील जनता आणि कार्यकर्त्यांची अपेक्षा असल्याचे कडू म्हणाले.
Shivprakash : शिवप्रकाश यांच्याकडे महाराष्ट्रासह पाच राज्यांची जबाबदारी
- भाजपकडून संघटनात्मक फेरबदल; अजय जामवाल प्रदेश महासचिव, सतीश धोंडांकडे जनजाती संपर्काची धुरा
मुंबई : भाजपने राष्ट्रीय पातळीवर संघटनात्मक फेरबदल करत ...
जळगाव जिल्ह्यात आधीच एक मंत्रिपद असले तरी दोन मंत्रिपदे ठेवून किशोर पाटील यांना कॅबिनेटमध्ये स्थान द्यावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाटील यांच्या मंत्रिपदासाठी आग्रह धरणार का, असा प्रश्न विचारला असता, ‘जोर’ या शब्दाला राजकारणात काही किंमत असेल आणि त्याच्या आधारे हक्काचे मंत्रिपद मिळत असेल, तर किशोर पाटील यांच्यासाठी तो जोर ताकदीने लावू, असे कडू यांनी सांगितले. दरम्यान, सत्ताधारी गोटात काही मंत्र्यांच्या कामगिरीचा अंतर्गत आढावा घेण्यात आल्याची चर्चा आहे. महत्त्वाची खाती असूनही अपेक्षित कामगिरी न करणाऱ्या तसेच संघटनात्मक पातळीवर अपेक्षित परिणाम साधता न आलेल्या काही मंत्र्यांच्या कामगिरीबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. अशा मंत्र्यांना डच्चू मिळेल आणि त्यांच्या जागी नवीन चेहरे दिले जातील, असे समजते.