ठाणे : ठाणे महानगरपालिकेने (TMC) शहरातील पाणीपुरवठ्याबाबत महत्त्वाची सूचना जारी केली आहे. शनिवार, 26 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून रविवार, 27 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत तब्बल 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. (Thane Water Cut)
केंद्र सरकारच्या AMRUT 2.0 योजनेअंतर्गत ठाण्यातील Temghar Water Treatment Plantमध्ये अधिक क्षमतेची पंपिंग यंत्रणा बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी पाणीपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे. (Thane Water Cut)
मुंबई: अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे. मुंबई महापालिकेकडून नागरिकांसाठी कृत्रिम विसर्जन ...
‘या’ भागांना फटका
या कालावधीत इंदिरानगर, साठेनगर, आंबेवाडी, डावलेनगर, सावरकरनगर, लोकमान्यनगर (पाडा क्रमांक 2, 3 आणि 4), चैतन्यनगर, परेरानगर, झांजेनगर, श्रीनगर, किसाननगर, शिवटेकडी, शांतिनगर आणि कैलासनगर परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
तसेच भाटवाडी, वाघरीपाडा, रुपादेवीपाडा, रामनगर, सी.पी. तलाव परिसर, येऊर, घोडबंदर रोड, पाटलीपाडा, वाकळ कुंप, ब्रह्मांड, पवारनगर, कोठारी कंपाउंड, डोंगरीपाडा आणि वाघबिळ या परिसरांवरही परिणाम होणार आहे. मुंब्रा रेतीबंदरसह आसपासच्या काही भागांनाही पाणीपुरवठा खंडित होणार आहे. (Thane Water Cut)
भिवंडी : शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भिवंडीच्या रोशन बाग परिसरातून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आला ...
पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतरही कमी दाबाची शक्यता
देखभाल आणि यंत्रणा बसविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात येणार आहे. मात्र, पुरवठा सुरळीत होण्यासाठी आणखी 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी मिळण्याची शक्यता महापालिकेने व्यक्त केली आहे.
त्यामुळे नागरिकांनी पाणीपुरवठा बंद होण्यापूर्वी पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा आणि पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे. पायाभूत सुविधा सुधारण्याच्या या कामासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असेही प्रशासनाने सांगितले आहे. (Thane Water Cut)