Shivprakash : शिवप्रकाश यांच्याकडे महाराष्ट्रासह पाच राज्यांची जबाबदारी

- भाजपकडून संघटनात्मक फेरबदल; अजय जामवाल प्रदेश महासचिव, सतीश धोंडांकडे जनजाती संपर्काची धुरा


मुंबई : भाजपने राष्ट्रीय पातळीवर संघटनात्मक फेरबदल करत गुरुवारी विविध राज्यांसाठी नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या मंजुरीने जाहीर झालेल्या या नियुक्त्यांमध्ये ज्येष्ठ नेते शिवप्रकाश यांच्याकडे महाराष्ट्रासह पाच राज्यांची राष्ट्रीय सह महामंत्री (संगठन) म्हणून जबाबदारी कायम ठेवण्यात आली असून, अजय जामवाल यांची महाराष्ट्राच्या प्रदेश महासचिव (संगठन)पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सतीश धोंड यांच्याकडे प्रदेश सह महामंत्री (संगठन)पदासह चार राज्यांतील जनजाती संपर्काची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. (Shivprakash)



शिवप्रकाश यांच्याकडे राष्ट्रीय सह महामंत्री (संगठन)पदाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि गोवा या राज्यांचा त्यांच्या कार्यक्षेत्रात समावेश करण्यात आला आहे. त्यांचे केंद्रीय कार्यक्षेत्र मुंबई निश्चित करण्यात आले आहे. तर अजय जामवाल यांची प्रदेश महासचिव (संगठन), महाराष्ट्र या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे केंद्रीय कार्यक्षेत्रही मुंबई राहणार आहे. त्यामुळे राज्यातील भाजपच्या संघटनात्मक कामकाजाची जबाबदारी जामवाल यांच्याकडे राहणार आहे. (Shivprakash)


सतीश धोंड यांची प्रदेश सह महामंत्री (संगठन), महाराष्ट्र या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्र या चार राज्यांतील जनजाति संपर्काची जबाबदारीही त्यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यांचे कार्यक्षेत्र नागपूर निश्चित करण्यात आले आहे. देशातील अन्य राज्यांसाठीही संघटनात्मक नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. सौदान सिंह यांच्याकडे बिहार, झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या चार राज्यांची राष्ट्रीय सह महामंत्री (संगठन) म्हणून जबाबदारी देण्यात आली असून, त्यांचे केंद्र भुवनेश्वर असेल. (Shivprakash)



व्ही. सतीश यांच्याकडे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती मोर्चा तसेच संसदीय कार्यालयाशी संबंधित जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांचे केंद्र दिल्ली असेल. नागेंद्र यांच्याकडे वरिष्ठ कार्यकर्ता संपर्काची जबाबदारी सोपवण्यात आली असून, त्यांचेही केंद्र दिल्ली राहणार आहे. मधुकर यांची आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या प्रदेश महासचिव (संगठन)पदी नियुक्ती करण्यात आली असून, त्यांचे केंद्र हैदराबाद असेल. धर्मपाल यांच्याकडे उत्तर प्रदेशच्या प्रदेश महासचिव (संगठन)पदाची जबाबदारी देण्यात आली असून, त्यांचे केंद्र लखनऊ असेल. अमिताभ चक्रवर्ती यांची पश्चिम बंगालच्या प्रदेश महासचिव (संगठन)पदी नियुक्ती करण्यात आली असून, त्यांचे केंद्र कोलकाता निश्चित करण्यात आले आहे. (Shivprakash)



Comments
Add Comment

Nashik Kumbh Mela 2027 : 31 ऑक्टोबरला राष्ट्रपतींच्या उपस्थितीत सिंहस्थाचा शुभारंभ, 6 हजार आदिवासींच्या हस्ते गोदा आरती

Nashik Kumbh Mela 2027 : नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आला आहे. कुंभमेळ्याचा

Xi Jinping Trump meeting : "स्पर्धक नव्हे, भागीदार बनूया" अमेरिका-चीन संबंधांवर राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे मोठे वक्तव्य

वॉशिंग्टन: चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आपल्या अमेरिका दौऱ्यावर वॉशिंग्टन येथे दाखल झाले आहेत. यावेळी

Ganeshotsav 2026: गणेशभक्तांना दिलासा; विसर्जनाच्या दिवशी रात्रभर धावणार ॲक्वा लाईन मेट्रो, रेल्वेचंही जाणून घ्या अपडेट

मुंबई: मुंबई मेट्रो 3 ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर गणपती

Shak: Trust No One Review : मुलीच्या शोधात निघालेली एक जिद्दी आई! परिणीती चोप्राच्या थ्रिलरमध्ये उत्कंठा आणि सस्पेन्स; पण...

मुंबई : अभिनेत्री परिणीती चोप्राने (Parineeti Chopra) नेटफ्लिक्सवरील 'शक: ट्रस्ट नो वन' (Shaque: Trust No One) या नवीन मिस्ट्री-थ्रिलर

Google Fitbit Air : 'गुगल फिटबिट एअर' भारतात 2 ऑक्टोबरला लॉन्च; लाँचपूर्वीच Flipkart वर किंमत लीक

मुंबई : Google चा स्क्रीन-फ्री फिटनेस ट्रॅकर Fitbit Air जागतिक पदार्पणानंतर आता भारतात दाखल होणार आहे. हे डिव्हाइस 2 ऑक्टोबर

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर थरार! चालत्या बसमधून धुराचे लोट अन् काही क्षणातच...; 14 प्रवाशांचा थरारक जीव वाचला

पनवेल : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गुरुवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास एक मोठी दुर्घटना घडली. पनवेल हद्दीतील