Friday, September 25, 2026

Lalbaugcha Raja 2026 : नातवंडांसह लालबागच्या राजाच्या आरतीत सहभागी झाले मुकेश आणि नीता अंबानी, पाहा Video

Lalbaugcha Raja 2026 : नातवंडांसह लालबागच्या राजाच्या आरतीत सहभागी झाले मुकेश आणि नीता अंबानी, पाहा Video

मुंबई : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर आज, 25 सप्टेंबर रोजी मुंबईत गणपती विसर्जनाला सुरुवात झाली आहे. बाप्पाला निरोप देण्यापूर्वी मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनीही 24 सप्टेंबरच्या रात्री लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी अंबानी कुटुंबातील सदस्यांचा साधा आणि पारंपरिक लूक चर्चेचा विषय ठरला.

मुकेश अंबानी यावेळी त्यांची नात आद्या हिला घेऊन लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आले होते. दर्शनासाठी जाताना त्यांनी आद्याला प्रेमाने जवळ घेतले होते. मुकेश अंबानी आणि त्यांच्या नातीमधील हा क्षण उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता.

यावेळी मुकेश अंबानी यांनी पांढरा हाफ स्लीव्ह शर्ट आणि गडद रंगाची पँट असा साधा पोशाख परिधान केला होता. तर नीता अंबानी यांनी पारंपरिक साडी परिधान केली होती. गुलाबी आणि मरून रंगाच्या छटांची प्रिंटेड सिल्क साडी, लाल ब्लाउज आणि गजऱ्याने सजवलेला अंबाडा असा त्यांचा लूक होता.

पाहा व्हिडिओ 
 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

नीता अंबानी यांनी यावेळी खास दागिनेही परिधान केले होते. त्यांच्या गळ्यातील लांब हारावरील गणपतीच्या आकाराचे पेंडंट विशेष लक्षवेधी ठरले. हिरे आणि पाचूच्या दागिन्यांसोबत त्यांनी कानातले आणि बांगड्याही घातल्या होत्या.

ईशा अंबानीची मुलगी आद्याही पारंपरिक पोशाखात दिसली. तिने गुलाबी रंगाचा प्रिंटेड कुर्ता-पायजमा आणि शरारा परिधान केला होता. तिच्या केसांची फ्रेंच वेणी करून त्यात गुलाबी फुले लावण्यात आली होती. अंबानी कुटुंबाच्या लालबागच्या राजाच्या दर्शनाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >