Anant Chaturdashi 2026 : अनंत चतुर्दशीसाठी मुंबई सज्ज; BMCच्या नियोजनाचे मंत्री आशिष शेलारांकडून कौतुक

मुंबई : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने गणेशमूर्ती विसर्जनासाठी चोख तयारी केली आहे. भाविकांची श्रद्धा जपत पर्यावरण संतुलनासाठीही महापालिकेने उत्तम नियोजन केले असल्याचे कौतुक राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी केले. (Anant Chaturdashi 2026)


शेलार यांनी स्वराज्य भूमी येथील गणेशमूर्ती विसर्जनाच्या तयारीची पाहणी करून महापालिकेच्या विविध व्यवस्थांचा आढावा घेतला. यामध्ये आपत्ती व्यवस्थापन, निर्माल्य संकलन, आरोग्य तपासणी व प्रथमोपचार केंद्र तसेच दिशादर्शक फलकांची व्यवस्था करण्यात आली आहे. (Anant Chaturdashi 2026)



अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर भाविकांना कोणतीही अडचण होऊ नये, यासाठी महापालिकेच्या विविध विभागांकडून आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. या तयारीबाबत शेलार यांनी समाधान व्यक्त करत महापालिका प्रशासनाचे कौतुक केले. (Anant Chaturdashi 2026)


यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, उपायुक्त चंदा जाधव, उपायुक्त प्रशांत सपकाळे, सहायक आयुक्त संतोष साळुंके यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

Ganpati Visarjan 2026 : 'पुढच्या वर्षी लवकर या'! मुंबईत 11 व्या दिवशी 430 गणेश मूर्तींचे विसर्जन

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 25 सप्टेंबर रोजी गणेशमूर्ती विसर्जनाचा 11वा दिवस पार पडत आहे. दुपारी 1200

Anant Chaturdashi 2026 : अनंत चतुर्दशीला मुंबईत वाहतूक निर्बंध; 22 हजारांहून अधिक पोलीस तैनात

अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल मुंबई : शुक्रवार, 25 सप्टेंबर रोजी अनंत

Nirma University Viral Video : 'जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है'; विद्यार्थ्याच्या वक्तव्यावर प्राध्यापक संतापले, स्टेजवर कॉलर पकडून...

अहमदाबाद : अहमदाबादमधील निरमा विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या स्टँड-अप कॉमेडी शोदरम्यान घडलेल्या एका

Ganesh Visarjan 2026: 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'; राज्यात विसर्जन मिरवणुकांना सुरुवात

बाप्पाला निरोप देण्यासाठी गुलालाची उधळण, फुलांचा वर्षाव आणि ढोल-ताशांचा कडकडाट यामुळे वातावरण भारावून गेले आहे.

Mumbai News : कोस्टल रोडवर चोरट्यांचा डल्ला! केबल कापल्याने सुरक्षा यंत्रणा विस्कळीत, पालिकेकडून तातडीने उपाययोजना सुरू

मुंबई : मुंबईतील धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्त्यावरील पथदिवे आणि सीसीटीव्ही

Ganeshotsav 2026 : अनंत चतुर्दशीसाठी मुंबई महापालिकेची जय्यत तयारी; 25 हजारांहून अधिक कर्मचारी तैनात

मुंबई : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने व्यापक तयारी