Friday, September 25, 2026

Nashik Ganesh Visarjan 2026 : नाशिकच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत भद्रकालीचा दबदबा ! 25 मंडळांचा अधिकृत क्रम जाहीर

Nashik Ganesh Visarjan 2026 : नाशिकच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत भद्रकालीचा दबदबा ! 25 मंडळांचा अधिकृत क्रम जाहीर

Nashik Ganesh Visarjan 2026 : गणेश विसर्जनाच्या मुख्य मिरवणुकीचे नियोजन आणि मंडळांचा अधिकृत क्रम जाहीर करण्यात आला आहे. यंदाच्या मिरवणुकीत शहरातील चार प्रमुख पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण 25 गणेश मंडळे सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे, यापैकी तब्बल 15 मंडळे भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहेत. त्यामुळे यंदाच्या मुख्य विसर्जन मिरवणुकीत भद्रकाली परिसरातील गणेश मंडळांची संख्या सर्वाधिक असणार आहे. उर्वरित मंडळांमध्ये सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 4, मुंबई नाका हद्दीतील 3 आणि पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 3 मंडळांचा समावेश आहे.

संवेदनशील भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त

नाशिक महानगरपालिकेच्या मानाच्या शासकीय रथापासून मुख्य मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. मिरवणूक मार्गावरील कायदा-सुव्यवस्था आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. भद्रकाली परिसर, जुने नाशिक आणि सराफ बाजार या संवेदनशील भागांमध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांसोबत होमगार्ड्सचीही नियुक्ती करण्यात आली असून, मिरवणुकीदरम्यान गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

गणेश विसर्जन मिरवणुकीतील 25 मंडळांचा क्रम

1. नाशिक महानगरपालिका – मानाचा शासकीय रथ

2. रविवारी कारंजा मित्र मंडळ

3. गुलालवाडी व्यायाम शाळा, सोमवार पेठ

4. भद्रकाली कारंजा मित्र मंडळ – साक्षी गणेश

5. श्रीमान सत्यवादी मित्र मंडळ, पेठरोड पंचवटी

6. सूर्यप्रकाश नवप्रकाश मित्र मंडळ – नाशिकचा राजा

7. सरदार चौक मित्र मंडळ, पंचवटी

8. श्री गणेश मूकबधिर मित्र मंडळ

9. रोकडोबा मित्र मंडळ, नाव दरवाजा

10. शिवसेवा युवक मित्र मंडळ, गाडगे महाराज पुतळा

11. शिवमुद्रा मित्र मंडळ – मानाचा राजा

12. युवक मित्र मंडळ, मुंबई नाका

13. दंडे हनुमान मित्र मंडळ, काजीपुरा चौक

14. युनायटेड फ्रेंड्स सर्कल, संदिप हॉटेलसमोर

15. श्री शनेश्वर युवक समिती, चौक मंडई

16. नेहरू चौक मित्र मंडळ, पिंपळपार

17. वेलकम सहकार्य मित्र मंडळ

18. गजानन मित्र मंडळ

19. महालक्ष्मी चाळ सोशल फाउंडेशन

20. शिवस्य जनसेवा समिती, बुरुड गल्ली

21. भोई मित्र मंडळ, भोई गल्ली, कथडा

22. नवक्रांती मित्र मंडळ, काठे गल्ली

23. विनय नगर मित्र मंडळ, विनय नगर

24. श्री तिळभांडेश्वर मित्र मंडळ, सराफ बाजार

25. हिंदू एकता आंदोलन पक्ष, द्वारका

मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या या 25 मंडळांच्या क्रमाची अधिकृत यादी जाहीर झाल्याने आता मिरवणुकीच्या नियोजनाला अंतिम स्वरूप मिळाले आहे. मिरवणूक शांततेत आणि सुरळीत पार पडण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >