तुर्भे : मराठा क्रांतीसूर्य स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या ९३व्या जयंतीनिमित्त तुर्भे येथे गुणवंत कामगार पुरस्कार वितरण आणि माथाडी कामगार मेळावा आयोजित करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत धनादेश दिला. (Niranjan Davkhare)
राज्यातील अनेक शेतकरी, कष्टकरी आणि संकटग्रस्त नागरिक दुष्काळाच्या परिस्थितीचा सामना करत असल्याने त्यांच्या मदतीसाठी हा पुढाकार घेण्यात आला. नैसर्गिक संकटाच्या काळात केवळ सहानुभूती न दाखवता आपल्या परीने मदत करणे हीच खरी सामाजिक जबाबदारी आहे, अशी भावना डावखरे यांनी व्यक्त केली. (Niranjan Davkhare)
मुंबई: अफगाण नागरिकांना बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय पासपोर्ट मिळवून देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. मुंबई, छत्रपती शिवाजी महाराज ...
यावेळी ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक भरत चव्हाण यांच्या वतीनेही मुख्यमंत्री सहायता निधीसाठी धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.(Niranjan Davkhare)
अडचणीच्या काळात शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी उभे राहणे ही लोकप्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी असल्याचे डावखरे यांनी सांगितले. त्यांच्या या पुढाकारातून संकटग्रस्त नागरिकांना मदत मिळण्यासाठी योगदान देण्याचा प्रयत्न करण्यात आला. (Niranjan Davkhare)






