Friday, September 25, 2026

Nagpur Crime News : नागपूरमध्ये दोन गंभीर घटना ! रस्ते अपघातात कामगाराचा मृत्यू तर दुसरीकडे अल्पवयीन मुलाची हत्या

Nagpur Crime News : नागपूरमध्ये दोन गंभीर घटना ! रस्ते अपघातात कामगाराचा मृत्यू तर दुसरीकडे अल्पवयीन मुलाची हत्या

Nagpur Crime News : नागपूर-अमरावती मार्गावरील गोंडखैरी टोल प्लाझाजवळ भीषण रस्ते अपघाताची घटना घडली. गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या या अपघातात संजय कंपनीत काम करणाऱ्या एका कामगाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच बदिराजा फाउंडेशनच्या टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. टीमने पोलिसांना माहिती देत घटनास्थळी मदतकार्य सुरू केले. अपघातामुळे महामार्गावर मोठी गर्दी झाली होती आणि काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली. या प्रकरणी संबंधित पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, अपघात नेमका कशामुळे झाला याचा शोध घेतला जात आहे.

जरीपटका परिसरात 16 वर्षीय मुलाची चाकूने हत्या

दरम्यान, गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलीस हाय अलर्टवर असतानाच जरीपटका परिसरातील जिंजर मॉलजवळ एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली.आबिद शेख असे मृत मुलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 14 ते 15 मुलांच्या टोळक्याने आबिदवर हल्ला केला. हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या आबिदला उपचारासाठी नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.नागपूरमध्ये एकाच रात्री घडलेल्या या दोन गंभीर घटनांमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >