
बांगलादेशचा डाव
बांगलादेशकडून अब्दुल्ला अल मुही आणि एसके जरिफ सियाम ही जोडी मैदानात उतरली होती. पण संघाच्या 4 धावा असताना एसके जरीफ सियाम बाद झाला. कावसेर अहमद 9, मोहम्मद फरीद हसन फैसल 17 आणि अहसान अल मुमिन 1 धाव करून तंबूत परतले. पण एका बाजूने अब्दुल्ला अल मुहीने झुंज सुरू ठेवली आणि 45 चेंडूत 50 धावांची खेळी केली. पण तो बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा बांगलादेशचा डाव गडगडला. अल रफी 20, रकीबुल होसन 26, रोबिउल हसन अनिक 0, रुबे इस्लाम रिझोन 0, शेख अतीकुर रहमान 1 धाव करून बाद झाले. तफीउल आलम तमीम हा 2 धावांवर नाबाद राहिला. पाकिस्तानच्या रिझवानुल्ला 8 षटकं टाकली आणि 30 धावा देत 5 विकेट काढल्या. तर मोहम्मद सय्यमने 2, अली रझाने 1 आणि अहमद हुस्सैनने 1 विकेट काढली.पाकिस्तानचा डाव
बांगलादेशने विजयासाठी दिलेल्या 139 धावांचा पाठलाग पाकिस्तानने सहज केला. पाकिस्तानच्या उस्मान खान आणि हयाम खान यांनी आश्वासक सुरूवात करून दिली. या जोडीच्या भागीदारीमुळे पाकिस्तानचा विजय निश्चित झाला. हयाम खानने 72 चेंडूत 69 धावांची खेळी केली आणि बाद झाला. पण तिथपर्यंत पाकिस्तानचा विजय निश्चित झाला होता. उस्मान खानने 54 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने नाबाद 64 धावा केल्या. तर अब्दुल कादीरने 5 चेंडूत एका षटकाराच्या मदतीने 8 धावांची नाबाद खेळी आणि संघाला विजय मिळवून दिला.
टीम इंडियाच्या विमानाला लँडिंगसाठी लागली तब्बल 26 मिनिटे; वेलिंग्टनमध्ये खेळाडूंचा जीव टांगणीला, नेमकं काय घडलं?
भारत न्यूझीलंड यांच्यातील तिसरा वनडे सामना पावसामुळे रद्द झाला आणि भारताची 2-0 ची आघाडी कायम राहिली. पण चौथ्या वनडे सामन्यापूर्वी भारतीय संघ दोन गटात ...





