IND vs WI: पहिल्या वनडेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! प्लेइंग 11 मध्ये होणार मोठे बदल, कारण की...
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका होत असून पहिला सामना तिरूवनंतपुरम येथे होत आहे. मात्र या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे. त्याला कारणही तसंच आहे.
September 26, 2026 04:08 PM
IND vs WI: पहिल्या वनडेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! प्लेइंग 11 मध्ये होणार मोठे बदल, कारण की...(Photo: BCCI Twitter)
भारत आणि वेस्ट इंडिया यांच्यातील पहिला वनडे सामना 27 सप्टेंबरला होत आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ जोरदार सराव करत आहेत. मात्र पहिल्या सामन्यापूर्वीच टीम इंडिायला धक्का बसला आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात कर्णधार शुभमन गिलचं खेळणं कठीण दिसत आहे. या सामन्याला अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक असताना कर्णधार शुभमन गिलला दुखापत झाली आहे. सराव सत्रादरम्यान त्याला ही दुखापत झाली आहे. त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. कारण पहिल्या सामन्यापर्यंत फिट होईल की नाही याबाबत शंका आहे. जर फिट अँड फाईन झाला नाही तर त्याची जागा कोण घेईल? हा प्रश्न आहे.
ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणाऱ्या सामन्यापूर्वी म्हणजे शुक्रवारी भारतीय संघ सराव करत होता. या सरावात शुभमन गिलला दुखापत झाली. नेटमध्ये फलंदाजी करत असताना एक चेंडू त्याच्या कोपऱ्याला जोरात लागला. त्यामुळे शुभमन गिल दुखापतीने कळवळला. त्याला झालेल्या वेदना इतक्या तीव्र होत्या की सिराज त्याच्याजवळ धावत गेला. त्यानंतर वैद्यकीय पथकाने त्याची तपासणी केली आणि त्याच्या दुखापतीवर बर्फाचा पॅक लावून बसवलं. त्यानंतर शुभमन गिल पुन्हा फलंदाजीला उतरलाच नाही. त्यामुळे चाहत्यांची चिंता वाढली आहे. अशा स्थितीत शुभमन गिलच्या गैरहजेरीत यशस्वी जयस्वालचा बॅकअप प्लान आहे. तर ऋतुराज गायकवाड, ध्रुव जुरेल आणि नमन धीर हा पर्याय देखील आहे.
भारताचा माजी स्टार फलंदाज सचिन तेंडुलकर आणि डावखुरा फलंदाज विनोद कांबळी यांची मैत्री क्रिकेटविश्वात सर्वश्रूत आहे. या दोघांनी शालेय, देशांतर्गत आणि ...
शुभमन गिलच्या गैरहजेरीत उपकर्णधार केएल राहुल संघाची धुरा सांभाळेल. कारण कर्णधाराला काही झालं तर ती जबाबदारी आपसूक उपकर्णधाराच्या खांद्यावर येते. दुसरीकडे, जसप्रीत बुमराहच्या गैरहजेरीत वेगवान गोलंदाजीची धुरा मोहम्मद सिराजच्या खांद्यावर असेल. त्याला प्रसिद्ध कृष्णाची साथ मिळाले. तर तिसरा वेगवान गोलंदाजीचा पर्याय म्हणून गुरनूर ब्रार किंवा आकिब नबीला संधी मिळू शकते. तर फिरकीची जबाबदारी रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांच्या खांद्यावर असेल.
भारताची संभाव्य प्लेइंग 11: केएल राहुल (कर्णधार), रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा, नीतीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, गुरनूर ब्रार, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.