Saturday, September 26, 2026

Ganeshotsav 2026 : महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाची परदेशी पर्यटकांनाही भुरळ; बाप्पाच्या विसर्जनात उत्साहाने सहभाग

Ganeshotsav 2026 : महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाची परदेशी पर्यटकांनाही भुरळ; बाप्पाच्या विसर्जनात उत्साहाने सहभाग

मुंबई : मुंबईतील गिरगाव चौपाटीवर झालेल्या गणेश विसर्जन सोहळ्यात 23 देशांतील आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी उत्साहाने सहभाग घेतला. ढोल-ताशांचा गजर, भव्य मिरवणूक आणि भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेत परदेशी पर्यटक महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत रमून गेले. (Ganeshotsav 2026)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्यटन विभागाच्या विशेष दालनाला भेट दिल्यानंतर या सहभागाचे कौतुक केले. गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा राज्यउत्सव असून पर्यटन विभागाने या उत्सवाला आंतरराष्ट्रीय स्वरूप दिले आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. हजारो लोकांच्या उपस्थितीत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेला विसर्जन सोहळा पाहून परदेशी पर्यटक भारावून गेल्याचेही त्यांनी नमूद केले.(Ganeshotsav 2026)

या सोहळ्यात थायलंडमधून आलेल्या पर्यटकांनी गणपती बाप्पाची आरती केली. परदेशी पर्यटकांनी गणरायाच्या मिरवणुकीत सहभागी होत ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष केला. काही पर्यटकांनी पारंपरिक महाराष्ट्रीयन वेशभूषा परिधान करून ढोल-ताशांच्या गजरात उत्सवाचा आनंद घेतला. अनेकांनी गणपतीच्या मूर्तींसोबत छायाचित्रे काढून हे क्षण कॅमेऱ्यात कैद केले. (Ganeshotsav 2026)

इटलीहून आलेले पर्यटक मार्को यांनी हा सोहळा पहिल्यांदाच अनुभवत असल्याचे सांगत तो श्रद्धा, एकता आणि आनंदाचा संगम असल्याचे म्हटले. तर फिनलँडहून आलेल्या जॉना सुनी यांनी ढोल-ताशे, पारंपरिक वेशभूषा आणि भक्तिमय वातावरणातून महाराष्ट्राच्या संस्कृतीची भव्यता अनुभवता आल्याचे सांगितले. (Ganeshotsav 2026)

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी परदेशी पर्यटकांना गणेशोत्सवात सहभागी करून घेणे हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरांचा जागतिक स्तरावर प्रसार करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. पर्यटन संचालक विकास पानसरे यांनीही विशेष दालनामुळे पर्यटकांना विसर्जन मिरवणूक जवळून पाहण्याची आणि गणेशोत्सवाच्या भावनेशी जोडले जाण्याची संधी मिळाल्याचे सांगितले. (Ganeshotsav 2026)

Ganesh Visarjan, Ganeshotsav 2026, Girgaon Chowpatty, Ganpati Visarjan, International Tourists, Foreign Tourists, Maharashtra Culture, Mumbai Ganeshotsav, Ganpati Bappa Morya, Ganesh Festival, Maharashtra Tourism, Mumbai Tourism, Devendra Fadnavis, Shambhuraj Desai,

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >