मुंबई: विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षणाच्या (एसआयआर) प्रक्रियेत महाराष्ट्रातील मतदारांना दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी निवडणूक आयोगाने 12 ऑक्टोबर 2026 ...
बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी 26 सप्टेंबर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 36268 एकूण गणपती मुर्तींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील 7051 गणेश मुर्तींचे, 28657 घरगुती गणेश मुर्तींचे आणि 560 गौरीच्या मुर्तींचे विसर्जन करण्यात आले. मिरवणुकींमध्ये मुंबईसह उपनगरांमधून लाखो भाविक सहभागी झाले होते. परंतू कुठेही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त समोर आले नाही. ध्वनी प्रदुषण टाळण्यासाठी अनेक ठिकाणी विसर्जनाच्या वेळी मुंबईकरांनी यंदा डीजेचा वापर न करता ढोल ताशांचा वापर केला होता. अवघे मुंबईकर ढोल ताशांच्या गजरामध्ये दंग झाले होते.
मुंबई : मुंबई बंदर प्राधिकरणाने अत्यंत अवजड आणि मोठ्या आकाराच्या औद्योगिक उपकरणांची यशस्वी हाताळणी करत नवी कामगिरी नोंदवली आहे. 24 सप्टेंबर 2026 रोजी ...
अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळपासूनच मुंबईतील अनेक मानांच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकींना सुरूवात झाली होती. अनेक तासांची ही मिरवणूक पार पडल्यानंतर सायंकाळपासून मानाच्या गणपतींचे विसर्जन होण्यासाठी सुरूवात झाली होती. मुंबईमध्ये कृत्रिम तलावासह, नैसर्गिक तलाव आणि चौपाटींवर अनेक ठिकाणी गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. सहा फुटांपुढच्या गणेश मुर्त्यांना चौपाटीवर गणेश मुर्ती विसर्जन करण्याचा सल्ला देण्यात आला होता. बीएमसीकडून अनेक वॉर्डांमध्ये मोठ्या प्रमाणावर कृत्रिम तलावांची निर्मिती केली होती. ठरवून दिलेल्या ठिकाणांवर मुंबईकरांना आनंदात आणि जल्लोषात "पुढच्या वर्षी लवकर या" असं म्हणत लाडक्या बाप्पाला निरोप दिला.