Saturday, September 26, 2026

वृंदावनमध्ये प्रेमानंद महाराजांच्या शिष्याचा संशयास्पद मृत्यू, चार मजली इमारतीवरून उडी ; आश्रमात खळबळ

वृंदावनमध्ये प्रेमानंद महाराजांच्या शिष्याचा संशयास्पद मृत्यू, चार मजली इमारतीवरून उडी ; आश्रमात खळबळ

वृंदावन (उत्तर प्रदेश) : मथुरेतील प्रसिद्ध प्रेमानंद महाराज यांचे शिष्य दीपक कुमार उर्फ ‘रसिक दुलारी सरन’ यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, त्यांनी प्रेमानंद महाराजांच्या आश्रमामागील एका सोसायटीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित करण्यात आले.

नेमकं काय घडलं ?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक कुमार हे गेल्या दीड वर्षापासून आश्रमामागील एका सोसायटीतील फ्लॅटमध्ये राहत होते. ते मूळचे मध्य प्रदेशातील जबलपूर येथील रहिवासी होते. फेब्रुवारी २०२५ मध्ये त्यांनी प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा घेतल्याची माहिती आहे. शुक्रवारी त्यांनी अचानक चौथ्या मजल्यावरून खाली उडी मारल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली. घटनेनंतर त्यांना तातडीने सर्वोदय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.या टोकाच्या पावलामागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

पोलिसांकडून विविध शक्यतांचा तपास

घटनेची माहिती मिळताच वृंदावन कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचा संशय व्यक्त केला जात असला, तरी मृत्यूमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे पोलिसांकडून आत्महत्या तसेच अन्य शक्यतांचा तपास केला जात आहे. आश्रमातील व्यक्ती आणि परिसरातील संभाव्य प्रत्यक्षदर्शींची चौकशी सुरू आहे.

मृतदेहावर जखमांच्या खुणा; फॉरेन्सिक तपासाकडे लक्ष

एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, पोलिसांना प्राथमिक तपासादरम्यान रसिक दुलारी यांच्या शरीराच्या संवेदनशील भागावर दुखापतीच्या खुणा आढळल्याची माहिती आहे. त्यांच्या खोलीतून एक ग्राइंडरही सापडल्याचे वृत्त आहे. काही प्रत्यक्षदर्शींनी त्यांच्या शरीरावर गंभीर जखमा असल्याचा दावा केला आहे. प्रत्यक्षदर्शींनी प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार रसिक दुलारी यांचं लिंगही कापलेलं होतं, तसंच बरंच रक्तही वाहत होतं.मात्र या सर्व बाबींची अधिकृत पुष्टी होणे बाकी असून, पोस्टमार्टम आणि पोलिस तपासानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

आश्रम परिसरात शांतता

या घटनेनंतर प्रेमानंद महाराजांच्या आश्रम परिसरात खळबळ उडाली आहे. अद्याप आश्रमाकडून या घटनेबाबत अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. पोलिसांकडून तपास सुरू असून, मृत्यूमागील नेमके कारण शोधण्यासाठी उपलब्ध पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांचा आधार घेतला जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >