
कोलकात्यातील २५ वर्षीय आयटी व्यावसायिकाच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. कोलकाता येथे लिव्ह इनमध्ये राहणारे जोडपे दुपारी दिवाळीसाठी फटाके आणि रात्रीच्या जेवणासाठी मटण खरेदी करण्यासाठी बाहेर गेले होते. काही तासांनंतर तरुणाचा मृत्यू झाला. मृत तरुणाचे नाव सार्थक सरकार असून याप्रकरणी त्याची प्रेयसी संचालिका बसू व तिची आई मौमिता यांना अटक करण्यात आली. तसेच घटनास्थळी सापडलेले शस्त्रदेखील जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्थक अंडी संचालिका कोलकात्याच्या गरिया भागातील एका भयाच्या फ्लॅटमध्ये एकत्र राहत होते. सार्थकचे कुटुंब बारासातमध्ये राहते आणि तो सॉल्ट लेक सेक्टर ५ मधील एका आयटी फार्ममध्ये काम करत होता. स्थानिक रहिवाश्यांच्या म्हणण्यानुसार रविवारी संध्याकाळी सार्थक आणि संचालिका अगदी सहज आणि निवांत दिसत होते. पहाटे सुमारे दीड वाजता रहिवाशांना त्या जोडप्याच्या फ्लॅटमधून मोठ्याने भांडणाचा आवाज ऐकू आला. वाद वाढत गेल्याने शेजारी मध्यस्थी करण्यासाठी अपार्टमेंटमध्ये गेले. तिथे त्यांना एक धक्कादायक दृश्य दिसले. सार्थक पलंगावर कोसळला होता आणि त्याच्या मानेवरील गंभीर जखमांमधून रक्त वाहत होते. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि संचालिका व तिच्या आईला अटक केली. नेमके काय घडले आणि हत्येच्या वेळी नेमकी परिस्थिती काय होती, याचा पोलीस तपास करत आहेत.
छत्रपती संभाजीनगर येथे एका ज्येष्ठ व्यक्तीची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. सिडको एन ४ येथील एका ७२ वर्षीय ज्येष्ठ व्यक्तीची बनावट शेअर ट्रेडिंग ...
तपास अधिकाऱ्यांच्या मते, रविवारी रात्री कोणत्यातरी मुद्द्यावरून त्या जोडप्यात वाद झाला. संचालिकाने कथितरित्या सार्थकवर एका धारदार वस्तूने वार केला. पोलीस संचालिकाची आई मौमिता हिच्या भूमिकेचीही चौकशी करत आहेत. मौमिता या घटना घडली त्यावेळेस फ्लॅटवर उपस्थित होत्या आणि घटनेच्या वेळी कोणताही आरडाओरडा केला नाही किंवा सार्थकला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. बारासात येथे राहणारे सार्थकचे वडील आणि बहीण, अनेक तासांपर्यंत त्याच्याशी संपर्क होऊ न शकल्यामुळे चिंतेत पडले होते. त्यानंतर शेजाऱ्यांच्या मदतीने कुटुंबातील सदस्य त्या फ्लॅटवर पोहोचले.






