चंदीगड : लग्नाच्या मुद्द्यावरून झालेल्या कौटुंबिक वादानंतर चंदीगड पोलिसांच्या हेड कॉन्स्टेबलची गोळ्या झाडून हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी मृत हेड कॉन्स्टेबल नितीन सिंह यांचा मुलगा अरमान याला अटक केली असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे. (Chandigarh Crime)
नितीन सिंह हे चंदीगड पोलिसांच्या मुख्यालयातील अकाउंट्स शाखेत कार्यरत होते. शुक्रवारी सकाळी सेक्टर २२ येथील सरकारी निवासस्थानी त्यांचा गोळी लागलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. घटनास्थळावरून देशी बनावटीचे पिस्तूलही जप्त करण्यात आले आहे. (Chandigarh Crime)
Crime News : ठाणे शहरातून पोलीस दलाला हादरवणारी घटना समोर आली आहे. रात्रीच्या वेळी कर्तव्यावर असताना गस्त घालणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याची गावगुंडाने ...
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, नितीन सिंह आणि त्यांचा मुलगा अरमान यांच्यात गुरुवारी लग्नाच्या मुद्द्यावरून वाद झाला होता. अरमानला आपल्या प्रेयसीसोबत तातडीने लग्न करायचे होते. मात्र, त्याच्या पालकांनी २१ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच लग्न करण्यास सांगितले होते. याच मुद्द्यावरून वाद वाढल्याचे पोलिसांनी सांगितले. अरमानकडून पैशांची मागणीही केली जात असल्याचे तपासात समोर आले आहे. (Chandigarh Crime)
गोळीबारानंतर अरमानने त्याच्या आईलाही कथितरित्या धमकावल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या तावडीतून सुटल्यानंतर तिने छतावर जाऊन शेजाऱ्यांकडे मदत मागितली. दरम्यान, घटनेनंतर अरमानने घरात अज्ञात व्यक्ती घुसल्याची कथा सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
Nagpur Crime News : नागपूर-अमरावती मार्गावरील गोंडखैरी टोल प्लाझाजवळ भीषण रस्ते अपघाताची घटना घडली. गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ट्रकने दुचाकीला धडक ...
पोलिस सध्या गोळीबारामागील नेमके कारण, शस्त्र घरात कसे आले आणि घटनेचा संपूर्ण घटनाक्रम याचा तपास करत आहेत. अरमानच्या चौकशीतून या प्रकरणातील आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.(Chandigarh Crime)