न्यूयॉर्क: संयुक्त राष्ट्र महासभेत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताविषयी केलेल्या वक्तव्यांना भारताने अत्यंत आक्रमक आणि चोख प्रत्युत्तर दिले आहे. संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या स्थायी मिशनच्या प्रथम सचिव पेटल गहलोत यांनी पाकिस्तानचा बुरखा फाडत दहशतवाद, मानवाधिकार आणि PoK च्या मुद्द्यावरून पाकिस्तानला खडेबोल सुनावले. भारताने ठणकावून सांगितले की, जो देश स्वतः दहशतवादाचा उगमस्थान आहे, त्याने जागतिक मंचावर शांततेचा उपदेश करणे पूर्णपणे हास्यास्पद आहे.
मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी विविध सवलती व उपाययोजना लागू करण्यात ...
ओसामा बिन लादेन आणि दहशतवादावरून पाकिस्तान उघडा पडला
पेटल गेहलोत यांनी पाकिस्तानच्या दुटप्पीपणावर ताशेरे ओढताना म्हटले की, पाकिस्तान रात्री दहशतवादाला प्रोत्साहन देतो आणि दिवसा सुरक्षेच्या गोष्टी करतो. ज्या वेळी न्यूयॉर्क शहर ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यांची २५ वी वर्षपूर्ती पाळत आहे, त्याच कालावधीत हे लक्षात घेतले पाहिजे की या हल्ल्याचा सूत्रधार ओसामा बिन लादेन एका पाकिस्तानी लष्करी अकादमीजवळ आश्रयाला होता. दहशतवादाचा इतिहास असलेल्या देशाला भारताला किंवा जगाला शांततेचा धडा शिकवण्याचा कोणताही अधिकार नाही, असे भारताने स्पष्ट केले.(Petal Gahlot UN Speech)
काश्मीरवर भारताचे स्पष्टीकरण आणि PoK मधील अत्याचारांवर बोट
काश्मीरप्रश्नी पाकिस्तानला फटकारताना भारताने ठणकावले की, जम्मू-काश्मीर आणि लडाख हे भारताचे अविभाज्य भाग आहेत आणि कायम राहतील. पाकिस्तानने मानवाधिकारांवर बढाया मारण्याऐवजी स्वतः बेकायदेशीरपणे बळकावलेल्या पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) परिस्थितीकडे पाहावे. रावलकोटसह आजूबाजूच्या परिसरात पाकिस्तानी लष्कराकडून नागरिकांवर होणारे अमानुष अत्याचार, मनमानी हत्या आणि मूलभूत अधिकारांचे उल्लंघन जगभर लपलेले नाही, असे भारताने सुनावले.(India Pakistan UN)
Sunita Ahuja : बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्या वैवाहिक नात्याबाबत गेल्या काही काळापासून विविध चर्चा सुरू आहेत. आता पुन्हा एकदा या दोघांच्या ...
ईशनिंदा कायदे आणि लष्करी राजवटीवर जोरदार प्रहार
पाकिस्तानच्या अंतर्गत व्यवस्थेवर टीका करताना पेटल गहलोत म्हणाल्या की, ज्या देशाची संपूर्ण कायदेशीर व राजकीय व्यवस्था ईशनिंदा कायदे आणि धार्मिक कट्टरतेवर चालते, त्यांनी धार्मिक सहिष्णुतेवर बोलणे म्हणजे ढोंगीपणा आहे. पाकिस्तानातील हिंदू, शीख आणि ख्रिश्चन यांसारख्या अल्पसंख्याकांना ज्या अमानुष वागणूक दिली जाते, ती संपूर्ण जगाला ठाऊक आहे. तसेच, तिथले सरकार केवळ लष्कराद्वारे आणि लष्करासाठी चालवले जाते, कठपुतळीनेते बदलत असले तरी खरे निर्णय कोण घेते हे जगाला माहीत आहे.(Petal Gahlot UN Speech)
भारताचे 'शून्य सहनशीलता' धोरण
आपल्या भाषेचा शेवट करताना पेटल गहलोत यांनी स्पष्ट केले की, भारत कोणतीही अणुबॉम्बची धमकी किंवा दहशतवादाचे प्रेशर सहन करणार नाही. भारताचे दहशतवादाविरोधात 'शून्य सहनशीलता' (Zero Tolerance) धोरण आहे. सीमेपलीकडून होणाऱ्या कोणत्याही कुरापतीचे गंभीर परिणाम पाकिस्तानलाच भोगावे लागतील, असा कडक इशारा भारताने दिला आहे.(India Pakistan UN)






