रोहित शर्मा पुढे म्हणाला की, 'जोपर्यंत तुम्ही खेळत आहात, तोपर्यंत पुढे पाहण्यासारखं काहीतरी नेहमीच असतं. मी विश्वचषकाची आणि माझ्यासाठी पुढे काय आहे हे पाहण्याची आतुरतेने वाट पाहत आहे.' आयसीसी स्पर्धेत नियमित मालिकांपेक्षा वेगळे आव्हान असतं. वेगवेगळ्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध आणि वेगवेगळ्या परिस्थितीत खेळण्यासाठी तयारी आणि मानसिकतेमध्ये बदल आवश्यक असतो, असंही रोहित शर्मा याने सांगितलं.
रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने 2023 वनडे वर्ल्डकप स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. पण अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला आणि जेतेपदाचं स्वप्न भंगलं. आता हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रोहित शर्मा 2027 वनडे वर्ल्डकप स्पर्धेची आतुरतेने वाट पाहात आहे, असं दिसत आहे. 2027 वनडे वर्ल्डकप स्पर्धा ऑक्टोबर नोव्हेंबर या कालावधीत दक्षिण अफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे होणार आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत रोहित शर्माकडे स्वत:ला सिद्ध करण्याची पुन्हा एकदा संधी आहे. लॉर्ड्सवर शतकी खेळी केल्यानंतर रोहित शर्मा पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. आता त्याचा फॉर्म या मालिकेत कसा यावर बरंच काही ठरणार आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांचं त्याच्या खेळीकडे लक्ष लागून आहे.