महामुंबईब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी
‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमास मुंबईत उत्स्फूर्त प्रतिसाद; तब्बल २ लाख ५९ हजारांहून अधिक भाविक, नागरिकांनी घेतला मोफत आरोग्य शिबिरांचा लाभ
September 30, 2026 09:15 PM
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : यंदाच्या श्रीगणेशोत्सवाच्या मंगलमयी वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी आणि मुंबई महापौर वैद्यकीय सहायता निधीच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमास मुंबईकरांचा मोठा प्रतिसाद लाभला. १४ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सर्वंकष मोहिमेत एकूण २ लाख ५९ हजारांहून अधिक नागरिकांनी विनामूल्य उपलब्ध असलेल्या विविध वैद्यकीय व आरोग्य सेवांचा लाभ घेतला.
या मोहिमेत २५५ सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडपांमधील शिबिरांसह महानगरपालिकेचे १८९ दवाखाने, २५० हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि ८३ नागरी प्राथमिक आरोग्य व कल्याण केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विनामूल्य आरोग्य सेवा पुरवण्यात आल्या. त्याचप्रमाणे,
Ganesh Idols Immersion: कृत्रिम तलावांमध्ये तब्बल 97 टक्के गणेश मूर्तींचे विसर्जन, मुंबई महानगरपालिकेचा दावा
मुुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईकर श्रीगणेशभक्त आणि श्रीगणेश मंडळांनी उदंड प्रतिसाद देत तब्बल 97.27 टक्के श्रीगणेशमूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन केले ...
" target="_blank" rel="noopener">विविध नगरसेवक प्रभागांमध्ये २५५ ठिकाणी असंसर्गजन्य रोग तपासणी करण्यात आली.
ही सर्व ठिकाणे लक्षात घेता मोहिमेच्या कालावधीत एकूण ५ हजार ७४० आरोग्य तपासणी सत्रे मुंबईत पार पडली. या शिबिरांचा १ लाख ३८ हजार ४९२ पुरुष तर १ लाख २० हजार ५१४ महिला याप्रमाणे एकूण २ लाख ५९ हजार ००६ नागरिकांनी लाभ घेतला.(Mumbai Health Camp)
या विशेष आरोग्य मोहिमेत सार्वजनिक श्रीगणेश मंडळांच्या सहकार्याने आयोजित २५५ शिबिरांमध्ये ११ हजार २१८ भाविकांनी आरोग्य तपासणी करून घेतली. महानगरपालिकेच्या १८९ दवाखान्यांमध्ये ८४ हजार १४२ नागरिक, २५० हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना केंद्रांमध्ये ८३ हजार ६१ नागरिक आणि ८३ नागरी आरोग्य केंद्रांमध्ये ३७ हजार ७२७ नागरिकांनी सहभाग नोंदवला. त्याव्यतिरिक्त नगरसेवक प्रभागांमध्ये ठिकठिकाणी करण्यात आलेल्या असंसर्गजन्य रोग निदान तपासणीचा ४२ हजार ८५८ नागरिकांनी लाभ घेतला.
Ganesh Idols Immersion: कृत्रिम तलावांमध्ये तब्बल 97 टक्के गणेश मूर्तींचे विसर्जन, मुंबई महानगरपालिकेचा दावा
मुुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईकर श्रीगणेशभक्त आणि श्रीगणेश मंडळांनी उदंड प्रतिसाद देत तब्बल 97.27 टक्के श्रीगणेशमूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन केले ...
या संपूर्ण कालावधीत सर्व केंद्रांवर मिळून एकूण २१ हजार ४०५ नागरिकांची ताप तपासणी, १ हजार ३२६ अतिसार (गॅस्ट्रो) रुग्ण तपासणी, ४ हजार ७५२ संशयित क्षयरोग (टीबी) तपासणी आणि हिवताप (मलेरिया) निदानासाठी एकूण १५ हजार ४४९ रक्त नमुने घेण्यात आले.
या मोहिमेदरम्यान असंसर्गजन्य आजारांच्या लवकर निदानावर विशेष भर देण्यात आला होता. मुंबईभरात एकूण ३२ हजार ४२८ नागरिकांची उच्च रक्तदाब तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये १ हजार ६६० नवीन उच्च रक्तदाब रुग्णांचे वेळेवर निदान झाले. त्याचप्रमाणे, एकूण २२ हजार ८०५ नागरिकांची मधुमेह चाचणी घेण्यात आली असता, त्यातून १ हजार ५७ नवीन मधुमेह रुग्णांची नव्याने ओळख पटली.
या सर्व तपासण्यांनंतर अधिक सखोल तपासणी व उपचारांची गरज भासलेल्या एकूण २ हजार २२९ रुग्णांना महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये संदर्भित करण्यात आले आहे.(Mumbai Health Camp)