Ganesh Idols Immersion: कृत्रिम तलावांमध्ये तब्बल 97 टक्के गणेश मूर्तींचे विसर्जन, मुंबई महानगरपालिकेचा दावा

मुुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईकर श्रीगणेशभक्त आणि श्रीगणेश मंडळांनी उदंड प्रतिसाद देत तब्बल 97.27 टक्के श्रीगणेशमूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन केले असल्याचा दावा मुंबई महापालिका प्रशासनाने केला आहे. महानगरपालिका प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या 383 कृत्रिम तलावांमध्ये हे विसर्जन करण्यात आले. ही पर्यावरणपूरकता जपण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल सर्व श्रीगणेशभक्तांचे मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी आणि महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी आभार मानले आहे.


मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी यांच्या मार्गदर्शनाखाली, महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांच्या नेतृत्वात आणि उप आयुक्त (परिमंडळ - 2) तथा श्रीगणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे यांच्या देखरेखीत यंदाच्या श्रीगणेशोत्सवासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या.



यंदाच्या श्रीगणेशोत्सवात मुंबई एकूण 1 लाख 97 हजार 382 श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यापैकी 6 फुटांपर्यंतच्या एकूण 1 लाख 92 हजार 237 श्रीगणेशमूर्तींचे 383 कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करण्यात आले. यामध्ये 1 लाख 22 हजार 391 पीओपी मूर्ती आणि 69 हजार 846 शाडू मातीच्या मूर्तींचा समावेश आहे. तर 6 फुटांपेक्षा अधिक उंचीच्या 5 हजार 382 श्रीगणेशमूर्तींचे 67 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर विसर्जन करण्यात आले. यामध्ये 5 हजार 259 पीओपी आणि 123 शाडू मातीच्या मूर्तींचा समावेश आहे.


महानगरपालिका प्रशासनाने यंदा कृत्रिम तलावांची व्यापक व्यवस्था केली होती. मुंबईत विविध ठिकाणी 383 कृत्रिम तलाव, तसेच समुद्रकिनारे, चौपाट्या आणि अन्य ठिकाणी 67 नैसर्गिक विसर्जन स्थळे उपलब्ध करून देण्यात आली होती. 6 फुटांपर्यंतच्या श्रीगणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावांचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला होता. या कृत्रिम तलावांमध्ये विसर्जित करण्यात आलेल्या 6 फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींची संख्या 1 लाख 22 हजार 391, तर शाडू मातीच्या मूर्तींची संख्या 69 हजार 846 आहे. अशा प्रकारे 6 फुटांपर्यंतच्या एकूण 1 लाख 92 हजार 237 मूर्तींचे कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन झाले. त्याचवेळी 6 फुटांपेक्षा अधिक उंचीच्या मूर्तींसाठी नैसर्गिक विसर्जन स्थळांचा वापर करण्यात आला. या ठिकाणी 5 हजार 259 पीओपी आणि 123 शाडू मातीच्या, अशा एकूण 5 हजार 382 मूर्तींचे विसर्जन झाले.



मुंबईतील नैसर्गिक जलस्रोतांवर विसर्जनामुळे होणारा पर्यावरणीय परिणाम कमी करण्याच्या दृष्टीने कृत्रिम तलावात श्रीगणेशमूर्ती विसर्जित करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. मूर्तिकारांना पर्यावरणपूरक श्रीगणेशमूर्ती तयार करण्यासाठी 940 मेट्रिक टनांहून अधिक शाडू माती विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली होती. तसेच पर्यावरणपूरक गणेशमूर्तींच्या निर्मितीसाठी 25 हजार 400 लिटर पर्यावरणपूरक रंग विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले होते.


श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी महानगरपालिका प्रशासनाने व्यापक मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री तैनात केली होती. विसर्जन सोहळा सुरक्षित आणि सुरळीतपणे पार पाडण्यासाठी 25 हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचारी कार्यरत होते. उच्च न्यायालयाचे निर्देश, महाराष्ट्र शासनाच्या सूचना तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुषंगाने महानगरपालिका प्रशासनाने यंदाच्या श्रीगणेशोत्सवासाठी विविध उपाययोजना केल्या.

Comments
Add Comment

Powai Lake: पवई तलावांत जाणारे सांडपाणी १०० टक्के बंद

मुंबई (विशेष प्रतिनिधी): पवई तलावात मिसळणाऱ मलजलाच्या २० प्रवाहांना ‘इंटरसेप्ट’ करून ते भांडुप मलजल प्रक्रिया

‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमास मुंबईत उत्स्फूर्त प्रतिसाद; तब्बल २ लाख ५९ हजारांहून अधिक भाविक, नागरिकांनी घेतला मोफत आरोग्य शिबिरांचा लाभ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : यंदाच्या श्रीगणेशोत्सवाच्या मंगलमयी वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची विशेष काळजी

BMC News : मुंबईत ७० वर्षांवरील ज्येष्ठांना आयुष्यमान वय वंदना कार्ड; एमडीसी अभियानाचा २ ऑक्टोबरपासून शुभारंभ,महापालिकेच्यावतीने १०० दिवसांचा कार्यक्रम जाहीर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत मुंबई डिजिहेल्थ कनेक्ट (एमडीसी) अभियान १०० दिवसांच्या कालावधीसाठी राबविण्यात

Mumbai News: बोरिवलीत अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई, अतिक्रमण विभागाने 20 बांधकामे आणि 15 स्टॉल्स केले निष्कासित

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या ‘पादचारी प्रथम’ अभियानाची काटेकोर अंमलबजावणी

BMC : मागील २८ दिवसांमध्ये अस्वच्छता करणाऱ्यांकडून १८.७० लाखांचा दंड वसूल; तब्बल १,३३६ प्रकरणांमध्ये महापालिकेने केली दंडात्मक कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेने १ ते २८ सप्टेंबर २०२६ या कालावधीत घनकचरा व्यवस्थापन उपविधी, २०२५

सुट्टीच्या काळात प्रवाशांसाठी खूशखबर! मध्य रेल्वेकडून मुंबई - मडगांव आणि मुंबई - नागपूर दरम्यान 8 विशेष गाड्यांची घोषणा

मुंबई : सणासुदीच्या आणि सुट्टीच्या काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने