Powai Lake News : पवई तलावातील गाळ उपसणार

पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी आयआयटीची निवड


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : पवई तलावाचे पुनरुज्जीवनाचे काम हाती घेण्यात आले असून या तलावातील आता गाळ काढला जाणार आहे. 'पवई तलावाचे गाळ काढणेबाबत व्यवहार्यता तपासणी' करण्याचे काम हाती घेतले आहे. या कामाकरीता स्वयंसेवी संस्था ग्रीन यात्रा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे काम सामाजिक सेवा दायित्व निधीचा (सीएसआर) वापर करून करण्यात येणार आहे.


मुंबई शहराच्या पूर्व उपनगरातील आदि शंकराचार्य मार्गालगत असलेला पवई तलाव शहरातील महत्वाचा असा निसर्ग सुंदर तलाव आहे. या तलावाचे एकूण क्षेत्र २२३ हेक्टर असून पाणलोटाचे क्षेत्र ६.६१ चौरस कि.मी. आहे. तलावात अनेक जातीचे मासे, मगरी असून तलाव परिसरात अनेक जातीचे स्थलांतरित पक्षी वर्षातील काही काळ दृष्टीस पडतात. अशा प्रकारे तलाव व परिसरातील जैव विविधता निसर्ग समृद्ध असून लक्षात घेण्यासारखी आहे.


अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पवई तलाव पुनरुज्जीवन संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली २० ऑगस्ट २०२५ रोजी बैठक संपन्न झाली. सदर बैठकीस महानगरपालिकेचे अधिकारी आणि पवई परिसरातील विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सदर बैठकीत सचिवांनी 'पवई तलावाचे गाळ काढणेबाबत व्यवहार्यता तपासावी' असे निर्देश दिलेले आहेत जल अभियंता विभागाने पवई तलाय पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत 'पवई तलावाचे गाळ काढणेबाचत व्यवहार्यता तपासणी' करण्याचे काम हाती घेतले आहे. सदर कामाकरीता स्वयंसेवी संस्था ग्रीन यात्रा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे काम सामाजिक सेवा दायित्व निधीचा (सीएसआर) वापर करून करण्यात येणार आहे.



ग्रीन यात्रा यांचे मार्फत सदर काम दोन टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहे. यात टप्पा एकमध्ये 'पवई तलावाच्या पर्यावरणीय पुनर्संचयनासाठी वैज्ञानिक पूर्व-मूल्यांकन करणे' आणि टप्पा दोनमध्ये 'तलावातील गाळ काढणे' आदींचा समावेश आहे. सद्यस्थितीत ग्रीन संस्थेच्या १ अंतर्गत काम करण्यात येत आहे. तलावातील गाळ यात्रा यांचेमार्फत टप्पा काढण्यासाठीची तांत्रिक पद्धती ठरविणे आणि काढलेल्या गाळाची विल्हेवाट लावण्यासाठी विविध तांत्रिक बाबी तपासण्यासाठी आय. आय. टी. मुंबई या संस्थेतील तज्ञ सल्लागार यांची मदत घेण्यात येणार आहे. हे काम करत असताना तलावातील जैव विविधता, जलचर इत्यादीनाधोका उद्भवू नये याकरिता बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या संस्थेची मदत घेण्यात येणार आहे.


टप्पा १ अंतर्गत करण्यात येणा-या वैज्ञानिक पूर्व-मूल्यमापनमध्ये 'पाण्याच्या गुणवत्तेचे मूल्यमापन करणे' हा एक अविभाज्य भाग आहे. पर्यावरणीय -हास रोखण्यासाठी, जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी आणि गाळाची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी गाळ काढण्यापूर्वी पाण्याच्या गुणवत्तेचे मूल्यमापन करणे अत्यंत आवश्यक आहे. गाळ उपसण्याचे काम करत असताना गाळात अडकलेली प्रदूषके पुन्हा पाण्याच्या मूळ प्रवाहात मिसळण्याची शक्यता असते, ज्यामुळे तलावाच्या परिसंस्थेचे प्रचंड नुकसान होऊ शकते. ही संस्था आयआयटी-मुंबई येथील पर्यावरण विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागातील संशोधक आहेत. हे काम करत असताना पवई तलावातील जैव विविधता, जलजीव सृष्टीचे संरक्षण आणि संगोपन या बाबी लक्षात घेऊन विशेष काळजी घेण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

Mumbai Water Crisis : ...तर मुंबईत निर्माण झाला असता पाण्याचा दुष्काळ

पाणीकपातीचा निर्णय सरकारच घेणार महापालिका प्रशासनाचा सभागृहात मागणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईला पाणी

BMC News : जीएमएलआर प्रकल्प कामांसाठी फिल्मसिटीला मोजणार २० कोटी रुपये

जमिनीचा तात्पुरता वापरासाठी भाडे आणि नुकसान भरपाईची केली मागणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव चित्रनगरी

BMC : महानगरपालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मिळणार रोबोटिक्स तंत्रज्ञानाचे धडे

तब्बल ५० शिक्षक आणि अधिकाऱ्यांचा आयआयटी मुंबई येथे अभ्यास दौरा मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या

Lalbaugcha Raja : 'लालबागच्या राजा'च्या चरणी ₹6.11 कोटींचे दान; सोन्या-चांदीसह 2 बाईकचा होणार लिलाव

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या 93 व्या गणेशोत्सवात भक्तांनी मोठ्या

Mumbai Rat Found In Dosa: किळसवाणा प्रकार! मुंबईच्या हॉटेलमध्ये मसाला डोशात मेलेला उंदीर, दोन घास घेताच...

मुंबई: हॉटेल- रेस्टॉरंटमध्ये बऱ्याचदा अस्वच्छता, किळसवाण्या पद्धतीने जेवण बनवणं आणि अनेक स्वच्छतेचे नियम

Mumbai- Ahamadabad Bullet Train Project: महाराष्ट्रात बुलेट ट्रेन प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा, भिवंडीमध्ये पहिल्या स्टील पूलाची उभारणी

ठाणे: मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासंबंधित महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये