दादासाहेब फाळके चित्रनगरीचा आणखीन विस्तार होणार, सांस्कृतिक कार्य विभागाला जमीन देण्यास शासनाची मान्यता

मुंबई: फिल्म सिटीचा आता आणखीन विस्तार होणार आहे. दादासाहेब फाळके चित्रनगरीचा आणखीन विस्तार करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाला जमीन देण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. सध्या गोरेगावमध्ये दादासाहेब फाळके चित्रनगरी आहे. पण आता मानखुर्दमध्येही 14 एकर जमिनीवर फिल्म सिटी उभारली जाणार आहे. या ठिकाणी बाह्य चित्रकरणासाठीची जागा तयार केली जाणार आहे. त्यामुळे ठाणे, मुंबई आणि पनवेल परिसरामध्ये राहणाऱ्या सेलिब्रिटींच्या दृष्टीने दुसरी फिल्म सिटी सोयीस्कर होईल.



मौजे मानखुर्द, ता. कुर्ला येथील सर्व्हे क्रमांक 138 पैकी तसेच लगतच्या मिळकतीतील अंदाजे 14 एकर म्हणजेच सुमारे 56 हजार 666 चौ.मी. जमीन सांस्कृतिक कार्य विभागाला बाह्य चित्रिकरणासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. जमीन महाराष्ट्र जमीन महसूल जमीन संहिता, 1966 मधील कलम 40 नुसार प्राप्त अधिकारात महसूल मुक्त आणि भोगाधिकार मूल्यरहित किंमतीने देण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. बाह्य चित्रिकरणासाठी सांस्कृतिक कार्य विभागाला जमीन देण्यासाठी आज शासनाने मान्यता दिली आहे. राज्य शासनाच्या वतीने सेलिब्रिटींकरिता अनेक उपाययोजना आखल्या जात आहेत.






“महाराष्ट्राच्या चित्रपटसृष्टीला आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. दादासाहेब फाळके यांच्या नावाने असलेल्या चित्रनगरीच्या विकासासाठी बाह्य चित्रिकरणासाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देताना शासनाने सार्वजनिक हित आणि जमिनीचा नियोजनबद्ध वापर यांचा समतोल साधला आहे.”, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. दरम्यान, बाह्य चित्रिकरणासाठी सांस्कृतिक कार्य विभागाला जमीन देण्यास शासनाची मान्यता मिळाल्यानंतर महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार सुद्धा मानले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार घेतलेल्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक क्षेत्राला निश्चितच चालना मिळणार असल्याची प्रतिक्रिया सुद्धा बावनकुळे यांनी दिली आहे.


Comments
Add Comment

Mumbai Weather: पुन्हा छत्री काढा! शनिवार- रविवार मुंबईकरांसाठी धोकादायक, पुढचे 48 तासांसाठी हवामान विभागाचा रेड अलर्ट

मुंबई: मुंबईकरांना ऑक्टोबर हिटचा कमालीचा फटका बसणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवाती पासूनच मुंबई, उपनगरातील

“कालच्या काल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी शब्द पाळला” — आमदार विक्रम पाचपुते

मुंबई : 30 सप्टेंबर रोजी MPSC विद्यार्थी प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि मागण्या

Dino Morea Arrest: मोठी बातमी! मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी अभिनेता डिनो मोरियाला अटक

मिठी नदीतील गाळ उपसा आणि सफाईच्या कामातील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अभिनेता डिनो मोरिया याला मुंबई पोलिसांच्या

BEST Bus Route Changes: बेस्टच्या बसमार्गांमध्ये होणार 'हे' महत्त्वाचे बदल! या फेऱ्या होणार रद्द; जाणून घ्या सविस्तर

मुंबई: बेस्ट बस म्हणजे मुंबईकरांची दुसरी जीवनवाहिनी! मुंबईचा चाकरमानी हा आपल्या दैनंदिन आयुष्यात प्रवास करताना

Nehru Science Centre : नेहरू विज्ञान केंद्र ते नेहरू तारांगण उड्डाणपूल, सब वे प्रकल्पाचे ३१ जानेवारी २०२७ पर्यंत करणार पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्र ते नेहरू तारांगण दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे

Mid Day Meal : महापालिका शाळांमधील खिचडी वाटपावर प्रश्नचिन्ह

महिला बचत गटांच्या कामांवर स्थायी समिती असमाधानी शिक्षण समिती अध्यक्षांसह नगरसेवकांनी व्यक्त केली