BEST Bus Route Changes: बेस्टच्या बसमार्गांमध्ये होणार 'हे' महत्त्वाचे बदल! या फेऱ्या होणार रद्द; जाणून घ्या सविस्तर

मुंबई: बेस्ट बस म्हणजे मुंबईकरांची दुसरी जीवनवाहिनी! मुंबईचा चाकरमानी हा आपल्या दैनंदिन आयुष्यात प्रवास करताना बेस्टचा वापर करतो. प्रवाशांची बेस्ट साठी असलेली वाढती मागणी लक्षात घेऊन बेस्टने बसमार्गांमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्याचे ठरवले आहे. आठ मार्गांवर वातानुकूलित बससेवा सुरु होणार असून १४ मार्ग हे बदलण्यात येणार आहेत. तसेच एक मार्ग रद्द करण्यात येणार आहेत. या बदलांमध्ये घाटकोपर, विक्रोळी, अंधेरी, बोरिवली यांसारख्या मार्गांचा समावेश आहे. हा बदल ५ ऑक्टोबर पासून सुरू होईल असे सांगण्यात येते.


या मार्गांमध्ये होणार बदल -




  • जिजामाता उद्यान ते मजास आगार असा प्रवास करणाऱ्या ए-२२, ए-३५ आणि ए-३९ या तीन बसेस मजास डेपो येथे थांबण्याऐवजी seepz येथे थांबतील.

  • अल्प प्रतिसादामुळे ए-३० हा बसमार्ग जो रमाबाई नगर ते विक्रोळी आगरदरम्यान विक्रोळी रेल्वे स्थानक उड्डाणपुलामार्गे जात होता तो आता रद्द करण्यात येणार असून हा मार्ग आता रमाबाई नगर मार्गे घाटकोपर बसस्थानक ते लालबहादूर शास्त्रीमार्गे विक्रोळी आगार असा असणार आहे.

  • ए- ४१९ आणि ए- ४२७ या दोन बससेवा घाटकोपर आगारापासून सुरु होतील ते संघर्ष नगर मार्गे फिल्टर पाडाच्या दिशेने धावतील.

  • ए- ४३३ या बसचा मार्ग आता अंधेरी स्थानकाऐवजी जेव्हीपीडी बसस्थानकापर्यंत वाढवण्यात येणार आहे.

  • ए-२०० हा बसमार्ग काळाचौकी येथील यशवंते चौकापर्यंत वाढवण्यात येणार आहे.




 

आठ एसी बसमार्ग पुढीलप्रमाणे -




  • १४५ - भायखळा स्टेशन पश्चिम ते नायर हॉस्पिटल

  • २२३ लि. - सात बांगला बस स्टेशन ते समता नगर बस स्टेशन

  • २४२ - अंधेरी स्थानक पश्चिम ते मिल्लत नगर

  • २४९ - अंधेरी स्थानक पश्चिम ते वर्सोवा यारी रोड बस स्टेशन

  • २६६ - अंधेरी स्थानक पश्चिम ते स्वामी समर्थ नगर

  • ३१२ - प्रतीक्षा नगर डेपो ते seepz बस स्टेशन

  • ४२३ मुलुंड चेकनाका ते चांदिवली

  • ५०५ - सांताक्रूझ डेपो ते सीबीडी बेलापूर बस स्टेशन


अल्प प्रतिसादामुळे ४७१ हा घाटकोपर बस स्थानक ते बोरिवली स्थानक ईस्ट दरम्यानचा बसमार्ग पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Dino Morea Arrest: मोठी बातमी! मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी अभिनेता डिनो मोरियाला अटक

मिठी नदीतील गाळ उपसा आणि सफाईच्या कामातील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अभिनेता डिनो मोरिया याला मुंबई पोलिसांच्या

Nehru Science Centre : नेहरू विज्ञान केंद्र ते नेहरू तारांगण उड्डाणपूल, सब वे प्रकल्पाचे ३१ जानेवारी २०२७ पर्यंत करणार पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्र ते नेहरू तारांगण दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे

Mid Day Meal : महापालिका शाळांमधील खिचडी वाटपावर प्रश्नचिन्ह

महिला बचत गटांच्या कामांवर स्थायी समिती असमाधानी शिक्षण समिती अध्यक्षांसह नगरसेवकांनी व्यक्त केली

BMC : मुंबईत तब्बल ३४ टक्के पाण्याची गळती, चोरी

महापालिका प्रशासनाच्यावतीने आता प्राधान्याने यासाठी घेतली जाणार मोहिम मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई

अन्न व औषध प्रशासनाची राज्यव्यापी धडक कारवाई; सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कोट्यवधींचा अस्वच्छ व असुरक्षित अन्नसाठा जप्त

मुंबई : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अन्न व्यावसायिक आणि आस्थापनांवर अन्न व औषध

रायगडमधील दिवेआगार समुद्रकिनाऱ्यावरील दुर्घटनेवर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

मुंबई : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगार (Diveagar) समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी गेलेल्या