भारतीय महिला रिकर्व तिरंदाजी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत प्रथमच सुवर्णपदक पटकावले. अंतिम सामन्यात भारतीय संघाने विद्यमान विश्वविजेत्या दक्षिण कोरियाचा 5-3 असा पराभव केला. अंकिता भक्त, कीर्ती शर्मा आणि कुमकुम महोदय यांचा भारतीय संघ या सामन्यात मैदानात उतरला होता.
सामना सुरुवातीपासूनच चुरशीचा झाला. वेगवान वाऱ्यामुळे तिरंदाजांना अडचणींचा सामना करावा लागला. पहिल्या दोन सेटमध्ये दोन्ही संघांची बरोबरी झाली. दोन्ही सेटमध्ये भारत आणि दक्षिण कोरियाने अनुक्रमे 54 आणि 56 गुण मिळवत प्रत्येकी एक सेट पॉइंट मिळवला.
तिसऱ्या सेटमध्ये मात्र दक्षिण कोरियाच्या खेळाडूंची कामगिरी खालावली. कोरियन संघाने सलग तीन वेळा 8 गुण मिळवल्याने त्यांची एकूण गुणसंख्या 52 राहिली. याचा फायदा घेत भारतीय तिरंदाजांनी 55 गुण मिळवत हा सेट आपल्या नावावर केला.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा वनडे सामन्याची ऐतिहासिक नोंद झाली आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने 405 धावा केल्या आणि 406 धावांचं लक्ष्य टीम ...
चौथ्या सेटमध्ये दक्षिण कोरियाने 54 गुण मिळवले. भारताकडून कीर्तीने सुरुवातीला 8 गुण मिळवले. त्यानंतर हा स्कोअर 9 करण्यात आला. भारताची एकूण गुणसंख्या 54 झाली आणि चौथा सेट बरोबरीत सुटला. त्यामुळे भारताने 5-3 अशी आघाडी कायम ठेवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
HISTORIC GOLD FOR BHARAT! 🇮🇳🥇 Heartiest congratulations to Ankita Bhakat, Kumkum Anil Mohod and Kirti on winning the first-ever Gold Medal for India in the Recurve Women’s Team event at the Asian Games 2026. A memorable performance and a proud moment for the nation.… pic.twitter.com/szdLatNUwi
— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) October 2, 2026
यापूर्वी भारतीय महिला संघाने उपांत्य फेरीत चीनचा 5-1 असा पराभव करत आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रथमच प्रवेश केला होता. 2023 मध्ये हांगझोऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला कंपाउंड संघाने कांस्यपदक जिंकले होते.
भारतीय तिरंदाजीचे प्रशिक्षक लोकेश चंद यांनी या विजयाचे महत्त्व सांगताना दक्षिण कोरियाच्या संघाचा अनुभव आणि कामगिरीचा उल्लेख केला. दक्षिण कोरिया हा 10 वेळा ऑलिम्पिक चॅम्पियन राहिला असून 1978 नंतर अंतिम सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला नव्हता. अशा अनुभवी संघाविरुद्ध युवा भारतीय खेळाडूंनी मिळवलेला विजय विशेष ठरला.






