९० च्या दशकात आपल्या विनोदी अभिनयाने आणि नृत्याने घराघरांत पोहोचलेला अभिनेता गोविंदा आणि नव्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकार हे दोघे सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. गोविंदा आणि कोमल राणी यांच्या प्रेमसंबंध असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर धुमाकूळ घालतायंत. गोविंदाची पत्नी सुनीता अहुजा यांनीदेखील यावर उघडपणे वक्तव्य केलेलं आहे. अनेक सिनेकलाकारांनी सुनीता अहुजा यांची बाजू घेतली. तर गोविंदा आपल्यापेक्षा निम्म्या वयाच्या मुलीसोबत प्रेमसंबंधात असल्याच्या चर्चांमुळे सोशल मीडियावर ट्रोल झाले. गणपती दर्शनाला असूदेत किंवा मग एयरपोर्टवर असूदेत अनेकदा त्यांना एकत्र स्पॉटदेखील करण्यात आलं. सोशल मीडियावर सतत ट्रोलिंगचा सामना करून वैतागलेल्या कोमल राणीने अखेर याबद्दलचं मौन सोडलं आहे.
मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. अहमदाबादमधील साबरमती नदीवर बुलेट ट्रेनसाठी उभारण्यात येत असलेल्या ...
कोमलने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर स्टोरी टाकत टीका करणाऱ्यांना आणि चर्चा पसरवणाऱ्यांना उत्तर दिलं आहे. 'मी अनेकांना माझ्या आणि गोविंदाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल उघडपणे बोलताना पाहिलं आहे. पण अनेक गंभीर विषयांवर मत मांडण्याचं सोडून ते माझ्या वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित का करत आहेत? आमचे वैयक्तिक आयुष्य इतके सार्वजनिक कधी बनले की प्रत्येकाला त्यावर भाष्य करण्याचा अधिकार आहे असे वाटते का? ' असा प्रश्न तिने उपस्थित केला. गोविंदांसोबत एकत्र दिसण्यावरून झालेल्या टीकेवर मत मांडताना तिने लिहिले की, 'माझ्या आगामी चित्रपटाच्या हिरोसोबत बाप्पाच्या दर्शनासाठी जाऊन चित्रपटासाठी बाप्पाचे आशीर्वाद घेणे ही गोष्ट शरमेची किंवा दिखाव्याची कधी पासून झाली? आम्ही आमचा आगामी चित्रपट 'रुपा' ची घोषणा केली होती, आमचं एकत्र दिसणं यामागे चित्रपट हे कारण होतं. यापुढेदेखील आम्ही एकत्र चित्रपट करणार आहोत आणि त्यासाठी यापुढेही एकत्र दिसू. ज्यांना त्रास होत असेल त्यांना जळू द्या.' अशा कडक शब्दांत तिने पोस्ट केली.
पुढे कोणत्याही अभिनेत्रीचं नाव न घेता ती म्हणाली, 'चित्रपटसृष्टीतल्या आपली कारकीर्द थंडावलेल्या काही महिला आहेत, ज्यांचे चित्रपट आता बॉक्स ऑफिसवर चालत नाहीत त्यांच्याकडे आता काहीही उरलेलं नाही असं दिसतंय. त्या इतरांच्या वादात नाक खुपसून प्रसिद्धीत आणि चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतायत. असे लोक मला चांगलं समजतात की वाईट याचा मला काहीच फरक पडत नाही. मला वाटते की ते सर्व एकाच गटाचे सदस्य आहेत, जे त्यांच्या स्वतःच्या अयशस्वी विवाहांमधील निराशा दुसऱ्यांवर काढत आहेत. माझ्या नावाशी स्वतःला जोडून सतत चर्चेत राहण्याचा प्रयत्न थांबवा.' अशी चिथावणी तिने सोशल मीडियावरून दिली.