तब्बल १७ कापणार, २० पुनर्रोपित करणार या बदल्यात ६८७ झाडे लावली जाणार आहे, या झाडांचे रोपण प्रकल्पाच्या ठिकाणी तसेच अंधेरी ओशिवरा येथील क्लबच्या ...
‘रंगवा रंगाची दुनिया’, ‘कल्पनांना रंग द्या... प्रतिभेला वाव द्या...’ या संकल्पनेवर आधारित ही चित्रकला स्पर्धा रविवारी शारदाश्रम विद्यालय, दादर (पश्चिम) येथे सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत पार पडली. इयत्ता पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा तीन गटांत ही स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीला रंगांची जोड देत विविध विषयांवरील चित्रे साकारली.
पहिल्या गटात इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास सायकल, द्वितीय क्रमांकास व्हिडीओ गेम, तर तृतीय क्रमांकाच्या विजेत्यास स्टडी टेबल देण्यात येणार आहे. तसेच पाच विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ डिजिटल स्लेटची बक्षिसे देण्यात येणार आहेत. दुसऱ्या गटात इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम क्रमांकास सायकल, द्वितीय क्रमांकास ट्रॉली बॅग आणि तृतीय क्रमांकास हेडफोन, तर पाच उत्तेजनार्थ विजेत्यांना डी.एम. स्कूल बॅग देण्यात येणार आहेत.
मुंबईतील सातही परिमंडळांमध्ये टँकर सेवांसाठी कंत्राटदारांची नियुक्ती तब्बल १५०दिवसांसाठी आठ कोटींचा केला जाणार खर्च मुंबई (सचिन धानजी) : पावसाळा ...
तिसऱ्या गटात इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास मोबाईल, द्वितीय क्रमांकास टॅब आणि तृतीय क्रमांकास सायकल देण्यात येणार आहे. या गटातील पाच विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ हेडफोनची बक्षिसे देण्यात येणार आहेत. याशिवाय अन्य ३० विद्यार्थ्यांनाही उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येणार आहेत.
या स्पर्धेसाठी नितीन यादव, अविनाश मोकाशी, उदय डावल, अमोल बोचरे, पूजा काळे, रामदास शिर्के आणि दत्तात्रय कांबळे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. शारदाश्रम विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कांचन खरात, सुनीता गावडे, विकास धात्रक आणि राजेंद्र घाडगे यांचे स्पर्धेच्या आयोजनासाठी विशेष सहकार्य लाभले. शारदाश्रम संस्थेचे सेक्रेटरी गजेंद्र शेट्टी यांचेही विशेष सहकार्य मिळाले. दैनिक प्रहारचे संपादक पद्मभूषण देशपांडे आणि लेखा व प्रशासन विभाग प्रमुख ज्ञानेश सावंत यांची यावेळी विशेष उपस्थिती होती.
मुंबईतील चर खोदण्यासाठी महापालिकेने बनवले नवीन धोरण युटीलिटीज संस्थांना रस्त्याखाली डक टाकण्यास देणार परवानगी चर बुजवण्याच्या कामाचा हमी कालावधी ...
रंगल्या कल्पनांना रंग देणाऱ्या कलाकृती
चित्रकला स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीला रंगांची जोड देत एकाहून एक सुंदर कलाकृती साकारल्या. कागदावर उमटलेल्या रंगरेषांतून विद्यार्थ्यांची सर्जनशीलता आणि चित्रकलेची आवड ठळकपणे दिसून आली. तीन गटांत झालेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत आपल्या कल्पना चित्रांच्या माध्यमातून मांडल्या. चित्र काढताना आणि त्यात रंग भरताना विद्यार्थ्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता. विविध रंगांची आकर्षक उधळण, कल्पक मांडणी आणि चित्रांमधून व्यक्त झालेल्या भावना यामुळे स्पर्धेच्या ठिकाणी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळण्याबरोबरच त्यांच्या कल्पनाशक्तीलाही मुक्तपणे व्यक्त होण्याची संधी मिळाली.