मुंबई : ज्येष्ठ चित्रपट निर्माते, पटकथा लेखक आणि संगीतकार सिंगीतम् श्रीनिवास राव यांचे शनिवारी वयाच्या 94व्या वर्षी निधन झाले. भारतीय चित्रपटसृष्टीत सहा दशकांहून अधिक काळ योगदान देणाऱ्या राव यांनी अनेक भारतीय भाषांमध्ये काम केले. ‘पुष्पक विमान’, ‘आदित्य 369’ आणि ‘मयुरी’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमुळे त्यांना विशेष ओळख मिळाली.
राव यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. अभिनेता ज्युनियर एनटीआर यांनीही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत राव यांच्या आठवणींना उजाळा दिला. राव हे आपल्या काळाच्या पुढे विचार करणारे दिग्दर्शक होते. त्यांच्या चित्रपटांमध्ये वेगळे विषय आणि प्रयोग पाहायला मिळाले. त्यांच्या कुटुंबीयांप्रति मनःपूर्वक संवेदना व्यक्त करत ज्युनियर एनटीआर यांनी ‘ओम शांती’ असे म्हटले.
हवेत तब्बल 30 हजार फूट उंचीवर फ्लायदुबईच्या विमानात घडलेल्या धक्कादायक घटनेत भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छर यांनी प्रसंगावधान दाखवत मोठा धोका ...
सिंगीतम् श्रीनिवास राव यांनी ज्येष्ठ दिग्दर्शक के. व्ही. रेड्डी यांच्यासोबत काम करत चित्रपट क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली. 1957 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मायाबाजार’ या प्रसिद्ध चित्रपटाशीही त्यांचा संबंध होता. पुढे त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले आणि 60 हून अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन केले.
సింగీతం శ్రీనివాసరావు గారు ఇక లేరన్న వార్త ఎంతో బాధాకరం. ఆదిత్య 369, పుష్పక విమానం, మయూరి… కాలానికి ముందే ఆలోచించి, తరాలు మారినా కొత్తగా అనిపించే సినిమాలు అందించిన దార్శనికుడు. వారి కుటుంబ సభ్యులకు నా ప్రగాఢ సానుభూతి. ఓం శాంతి 🙏
— Jr NTR (@tarak9999) October 3, 2026
1985 मध्ये प्रदर्शित झालेला ‘मयुरी’ हा त्यांच्या महत्त्वाच्या चित्रपटांपैकी एक ठरला. नृत्यांगना सुधा चंद्रन यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले.
यानंतर 1987 मध्ये आलेल्या ‘पुष्पक विमान’ने त्यांच्या कारकिर्दीला वेगळी उंची दिली. कमल हासन अभिनीत हा ब्लॅक कॉमेडी चित्रपट संवादांशिवाय साकारण्यात आला होता. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लोकप्रिय मनोरंजनात्मक चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
कमल हासन यांच्यासोबत त्यांनी ‘अपूर्वा सगोदरार्गल’ आणि ‘मायकल मदना कामराजन’ यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले. तेलुगू चित्रपटसृष्टीतील ‘आदित्य 369’ हा त्यांचा आणखी एक महत्त्वाचा चित्रपट ठरला. भारतीय चित्रपटांमध्ये टाइम ट्रॅव्हलचा विषय फारसा चर्चेत नसताना त्यांनी विज्ञानकथेच्या माध्यमातून हा वेगळा प्रयोग केला होता.
सिंगीतम् श्रीनिवास राव यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एका प्रयोगशील आणि दूरदृष्टी असलेल्या दिग्दर्शकाची कारकीर्द संपली आहे.






