
मुंबई : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार धनुष, ममूटी आणि अभिनेत्री साई पल्लवी यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'ओम: ऑपरेशन मोल' (OM: Operation Mole) हा चित्रपट अखेर मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. राजकुमार पेरियासामी यांनी या चित्रपटाची कथा लिहिली असून दिग्दर्शनही त्यांनीच केले आहे. चित्रपट प्रदर्शित होताच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वर प्रेक्षकांच्या पहिल्या प्रतिक्रियांचा पाऊस पडू लागला आहे. सध्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. एका बाजूला धनुष, ममूटी आणि साई पल्लवी यांच्या दमदार अभिनयाचे कौतुक होत असताना, दुसऱ्या बाजूला चित्रपटाची लांबी आणि काही ठिकाणच्या संथ पटकथेवर काही प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
काय आहे चित्रपटाची कथा आणि कोण आहेत कलाकार ?
'ओम' या चित्रपटाची कथा एका गुप्त मोहिमेवर (कोव्हर्ट ऑपरेशन) आणि रक्तचंदनाच्या तस्करी करणाऱ्या मोठ्या टोळीभोवती फिरते. या ॲक्शन आणि क्राईम ड्रामामध्ये धनुष, ममूटी आणि साई पल्लवी यांच्यासोबतच अभिनेत्री श्रीलीला आणि ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह हे देखील महत्त्वाच्या भूमिकांत दिसत आहेत. इतकी मोठी आणि तगडी स्टारकास्ट असल्यामुळे प्रेक्षकांच्या या चित्रपटाकडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या.
प्रेक्षकांना काय आवडले आणि कोणत्या गोष्टी खटकल्या ?
सोशल मीडियावर अनेक प्रेक्षकांनी हा एक 'चांगला आणि पाहण्यासारखा' चित्रपट असल्याचे म्हटले आहे. विशेषतः सर्वच मुख्य कलाकारांचा सहजसुंदर अभिनय आणि चित्रपटातील भावनिक प्रसंग प्रेक्षकांना खूप भावले आहेत. एका प्रेक्षकाने आपला अनुभव सांगताना लिहिले की, "सर्व कलाकारांच्या जबरदस्त अभिनयामुळे हा एक चांगला चित्रपट बनला आहे. चित्रपटातील जंगलात चित्रित केलेले मारामारीचे दृश्ये (फायटिंग सीन) अतिशय रोमांचक आहेत आणि भावनिक प्रसंगही मनाला भिडतात. पण चित्रपटाचा कालावधी थोडा कमी असता, तर हा चित्रपट आणखी खिळवून ठेवणारा ठरला असता."
मुंबई : प्रभादेवी रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील रेल्वेच्या जागेवरील १०१ अतिक्रमित बांधकामांवर तोडकाम करण्यासाठी आलेल्या रेल्वेच्या पथकाला ...
साई अभ्यंकरचे पार्श्वसंगीत आणि साई पल्लवीच्या कामाची वाहवा
Barring some sloppy edit choices, #OM is a very well written and performed crime drama. Sai Pallavi steals the show, Mammootty and Dhanush are great casting decisions. @SaiAbhyankkar delivers as usual. But the film needed to be at least 15 mins shorter to be outstanding.
— Palani Senthil (@PalaniSen13) November 20, 2026
अनेक प्रेक्षकांनी ममूटी, धनुष आणि साई पल्लवी यांच्या अभिनयाला चित्रपटाची सर्वात मोठी ताकद मानले आहे. यासोबतच साई अभ्यंकर याने दिलेले पार्श्वसंगीत (बॅकग्राऊंड स्कोअर) आणि मध्यंतरापूर्वीचा (इंटरव्हल) भाग विशेष गाजत आहे. एका नेटकऱ्याने लिहिले की, "एडिटिंगमधील काही किरकोळ चुका सोडल्यास 'ओम' हा एक उत्तम क्राईम ड्रामा आहे. साई पल्लवीने आपल्या अभिनयाने संपूर्ण लक्ष वेधून घेतले आहे, तर ममूटी आणि धनुष यांना एकत्र आणणे हा निर्मात्यांचा उत्तम निर्णय आहे. हा चित्रपट किमान १५ मिनिटे लहान असता, तर तो एक सर्वोत्कृष्ट कलाकृती ठरला असता."
अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' चित्रपटाशी केली जातेय तुलना
Om - Decent. All three lead roles did well. Story songs bgm to an extent worked well. But screenplay could have been better. When you go for 3hrs the narration should have wow moments at regular intervals to make the length feel easier. Very convenient writing. Climax surprise 👌 https://t.co/0VeKfn4hoL
— Adith (@adith2109) November 20, 2026
रक्तचंदनाच्या तस्करीचा विषय असल्यामुळे अनेक चाहत्यांनी या चित्रपटाची तुलना थेट अल्लू अर्जुनच्या सुपरहिट 'पुष्पा' चित्रपटाशी करायला सुरुवात केली आहे. एका चाहत्याने उत्साहाने प्रतिक्रिया दिली की, "ओम हा एक अप्रतिम चित्रपट आहे! धनुष आणि ममूटी यांनी पडद्यावर कमाल केली आहे. साई अभ्यंकरच्या करिअरमधील हे आजवरचे सर्वोत्कृष्ट संगीत असून, पुढील १० वर्षे तो संगीत क्षेत्रावर राज्य करेल. या चित्रपटाने 'पुष्पा'लाही मागे टाकले आहे. चित्रपट पाहताना वेळ कसा निघून जातो हे कळतही नाही. हा या वर्षाचा पुढचा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरेल."
३ तासांचा कालावधी आणि पटकथेमुळे काहींचा हिरमोड
#OM
Had a story with the potential to become a blockbuster, but due to over dramatic screenplay, it didn't quite land. Still, a ONE-TIME WATCH. I can confidently say this has some of the worst editing and sound mixing I've seen in a recent film 👎🏼 https://t.co/mxdH3FSr7m — Cinemaniac (@CinemaniaC10jr) November 20, 2026
दुसरीकडे, काही प्रेक्षकांना चित्रपटाची तीन तासांची लांबी आणि काही प्रसंग खटकले आहेत. एका युजरने आपले मत मांडताना म्हटले की, "तिन्ही मुख्य कलाकारांनी आपापल्या भूमिका चोख बजावल्या आहेत. कथा, गाणी आणि संगीत ठीक आहे, पण पटकथा आणखी दमदार होऊ शकली असती. जेव्हा तुम्ही ३ तासांचा चित्रपट पाहता, तेव्हा ठराविक वेळाने प्रेक्षकांना थक्क करणारे प्रसंग (वाव मोमेंट्स) यायला हवेत, ज्यामुळे चित्रपट लांबल्यासारखा वाटत नाही. मात्र, चित्रपटाच्या शेवटी (क्लायमॅक्स) असलेला ट्विस्ट नक्कीच चांगला आहे." तर आणखी एका युजरने म्हटले की, "या चित्रपटात ब्लॉकबस्टर होण्याची पूर्ण ताकद होती, पण अतिनाट्यमय पटकथेमुळे तो तितकासा प्रभावी ठरला नाही. तरीही हा एकदा नक्की पाहण्यासारखा चित्रपट आहे."
प्रदर्शनापूर्वी दोनदा बदलले होते चित्रपटाचे नाव
'ओम: ऑपरेशन मोल' या चित्रपटाची घोषणा नोव्हेंबर २०२४ मध्ये 'D55' या तात्पुरत्या नावाने करण्यात आली होती. त्यानंतर जून महिन्यात निर्मात्यांनी चित्रपटाचे नाव 'ओम चॅप्टर १: उधिरम - द ब्लड वूड' असे जाहीर केले होते. मात्र, चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होण्याच्या अवघ्या एक आठवडा आधी पुन्हा एकदा नाव बदलून ते 'ओम: ऑपरेशन मोल' असे निश्चित करण्यात आले.





