Airoli Katai Naka: ऐरोली-काटई नाका पुलाच्या कामासाठी 4 दिवस वाहतूक बंद, वाहन चालकांसाठी असे असतील पर्यायी मार्ग

नवी मुंबई: ठाणे आणि नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ठाणे- बेलापूर मार्गावरील ऐरोली- काटई नाका पुलाच्या कामासाठी ऑक्टोबर महिन्यामध्ये चार दिवसांसाठी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऐरोली- काटई नाका पुलाच्या कामासाठी ऐरोलीतील भारत बिजली कंपनीपासून सिमेन्स कंपनीपर्यंत गर्डर टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. रात्री उशिरा 11 वाजेपासून सकाळी 6 वाजेपर्यंत गर्डर टाकण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. एमएमआरडीएकडून ठरवून दिलेल्या वेळामध्ये हे काम पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.



ऐरोली- काटई नाका पुलाच्या कामासाठी ऑक्टोबर महिन्याच्या 4, 9, 10 आणि 11 अशा चार दिवसांसाठी वाहतूक बंदी करण्यात येणार आहे. ठाणे- बेलापूर मार्गावरून रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ह्या विशेष ब्लॉकचा नाहक त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे. 4, 9, 10 आणि 11 ऑक्टोबरला रात्री उशिरा 11 वाजेपासून सकाळी 6 वाजेपर्यंत गर्डर टाकण्याचे काम केले जाणार आहे. नवी मुंबई वाहतूक विभागाने प्रवाशांची गैरसोय होऊ नये आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. गर्डर टाकण्याच्या कामामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहनांना या मार्गावरून ये-जा करण्यास आणि पार्किंग करण्यास मनाई असेल.



ठाण्याकडून बेलापूरच्या दिशेने जाणाऱ्या सहा चाकी आणि त्यापेक्षा मोठ्या वाहनांना दिघा येथील मुकुंद कंपनीपासून एमआयडीसीच्या अंतर्गत रस्त्याने पुढे जाता येईल. चारचाकी वाहनांनी भारत बिजली चौकातून उजवीकडे वळून ऐरोली फायर ब्रिगेड चौक, खेडेकर चौक मार्गे इच्छित स्थळी जावे. बेलापूरहून ठाण्याकडे जाणाऱ्या वाहनांना रबाळे नाका सिग्नलवरून उजवीकडे वळून एमआयडीसी अंतर्गत रस्त्याने मुकुंद कंपनीमार्गे पुढे जावे. पटणीमार्गे जाणाऱ्या वाहनांसाठी रबाळे नाका- दिवा गाव सर्कल- पटणी रोड हा पर्यायी मार्ग उपलब्ध आहे. वाहनचालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांनी केले. रात्री उशिराच्या प्रवासाचे नियोजन करताना पर्यायी मार्गांचा विचार करण्याचा आणि परिसरात तैनात असलेल्या वाहतूक कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

24 तासांचा प्रवास 16 तासांत, मुंबई CSMT- बेंगळुरू मार्गावर धावणार दुसरी स्लीपर वंदे भारत ट्रेन; भाडं किती?

मुंबई: मुंबई- बेंगळुरू दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई CSMT- बेंगळुरू मार्गावर

कॅप्टन मच्छार यांच्या कुटुंबीयांना BMC च्या महापौर रितू तावडे यांची सदिच्छा भेट, स्मित यांच्या तब्येतीची केली विचारपूस

मुंबई: दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या 'फ्लाई- दुबई' कंपनीच्या विमानामध्ये सह वैमानिकाकडून झालेल्या प्राणघातक चाकू

Mumbai Local: रेल्वेचे 'हे' नियम मोडल्यास भरावा लागणार इतका दंड, वाचा नियमावली...

मुंबई: रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. विनातिकिट, बनावट तिकिट, दुसऱ्यांचा

दैनिक प्रहारच्या ‘किलबिल चित्रकला’ स्पर्धेला उदंड प्रतिसाद, 850 बाल चित्रकारांचा सहभाग

मुंबई: दैनिक प्रहारचे संस्थापक, माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायणराव राणे यांच्या अमृत

Tree Cutting : सिध्दार्थ नगरमधील इमारत पुनर्विकासात ३७ झाडे बाधित

तब्बल १७ कापणार, २० पुनर्रोपित करणार या बदल्यात ६८७ झाडे लावली जाणार आहे, या झाडांचे रोपण प्रकल्पाच्या ठिकाणी

BMC : मुंबईतील रस्ते पुन्हा टँकरच्या पाण्याने धुणार

मुंबईतील सातही परिमंडळांमध्ये टँकर सेवांसाठी कंत्राटदारांची नियुक्ती तब्बल १५०दिवसांसाठी आठ कोटींचा केला