आपण कॉकरोच नाही पँथर आहोत, कॉकरोचवाल्यांची मगरुरी चांगली नाही - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

रिपब्लिकन पक्ष हा संघर्ष करणारा पक्ष आहे. सामाजिक न्यायाची लढाई लढणारा पक्ष आहे. आपण सत्तेत जरुर आहोत, पण अन्याय झाला तर कोप-यात शांत बसु नका. अन्यायाविरुध्द रस्त्यावर उतरा. रिपब्लिकन पक्ष हा अन्याय झाला तर टराटरा फाडुन टाकण्याची ताकद ठेवणारा पक्ष आहे. ती ताकद दाखवा असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.


नवी मुंबईत विष्णुदास भावे नाटयगृह येथे रिपब्लिकन पक्षाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमीत्त आयोजित भव्य कार्यकर्ता मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणुन रामदास आठवले बोलत होते. यावेळी सभागृह कार्यकर्त्यांनी तुडुंब भरुन गेले होते. सभागृहाबाहेरही रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. रिपब्लिकन कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसत होता. रिपब्लिकन पक्षाचे नवीमुंबई जिल्हाध्यक्ष महेश खरे यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट संयोजन केले. रिपब्लिकन पक्षाच्या या कार्यकर्ता मेळाव्यास राज्यभरातुन रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते आणि नेते उपस्थित होते. यावेळी ना. रामदास आठवले, त्यांच्या पत्नी सौ. सिमाताई आठवले आणि पुत्र जित आठवले यांचा या कार्यक्रमाचे संयोजक जिल्हाध्यक्ष महेश खरे, ज्येष्ठ नेते सिद्राम ओव्हाळ आणि राज्यभरातील अनेक नेत्यांनी भव्य सत्कार केला. यावेळी महेश खरे आणि सिद्राम ओव्हाळ या दोन्ही नेत्यांचा रामदास आठवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


prahaar.in/2026/10/04/use-of-diamond-cutters-mandatory-for-digging-trenches-on-cement-concrete-roads/

रिपब्लिकन पक्षाच्या या कार्यकर्ता मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी रिपाइंचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजा सरवदे तसेच रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, काकासाहेब खंबाळकर, बाबुराव कदम, गौतम सोनवणे, युवक आघाडी राज्य अध्यक्ष पप्पु कागदे, एम एस नंदा; सुरेश बारसिंग, दयाल बहादुर, मुंबई अध्यक्ष सिध्दार्थ कासारे, विनोद निकाळजे, डी.एम. चव्हाण (मामा), अशोक गायकवाड, सुर्यकांत वाघमारे, पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर, रमेश मकासरे, रमेश अण्णा मुळे, बाळकृष्ण इंगळे, सुरेश जाधव, देवेंद्र शेलेकर, भास्कर वाघमारे, प्रल्हाद जाधव, नरेंद्र गायकवाड, राहुल सोनवणे, संजय भालेराव, उत्तमदादा कांबळे, बाळासाहेब गरुड;विवेक पवार; आदि अनेक मान्यंवर उपस्थित होते.


आपला पक्ष बौध्द वाडयापुरता मर्यादित ठेवायचा नाही. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या खुल्या पत्रावर आधारीत आपला रिपब्लिकन पक्ष व्यापक करायचा आहे. सर्व जाती धर्मीयांना रिपब्लिकन पक्षासोबत जोडले पाहिजे. केंद्रात मी मंत्री झाल्यापासुन आपला रिपब्लिकन पक्ष देशात 28 राज्यांत आणि 8 केंद्रशासीत प्रदेशात पोहचला आहे. नागालॅन्ड आणि मणिपुरमध्ये आपल्या पक्षाला मान्यता मिळुन गन्ना किसान हे निवडणुक चिन्ह मिळाले आहे. दुष्काळाच्या परिस्थीतीत आपण शेतक-यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. महाड, चवदारतळे क्रांतीच्या शताब्दी वर्षानिमीत्त आयोजित केलेला समता क्रांती मार्च दुष्काळामुळे आपण रद्द केला आहे. दुष्काळामुळे होरपळणा-या शेतकरी आणि शेतमजुराला मदत केली पाहिजे. त्यासाठी रिपब्लिकन पक्ष गरीब असला तरी आपण सर्वांनी राज्यभरातुन शंभर ट्रक भरुन जीवनावश्यक वस्तुंची मदत दुष्काळग्रस्तांना पाठवण्याचा आज संकल्प करुया, असे रामदास आठवले म्हणाले. शेतक-यांचे शेत गेले जळुन तरी सरकार नाही जाणार पळुन, सरकार शेतक-यांना निश्चित मदत करेल असे देखील आठवले म्हणाले.


आपण कॉकरोच नाही पँथर आहोत, कॉकरोचवाल्यांची मगरुरी चांगली नाही. देशाच्या प्रधानमंत्र्यावर, मुख्यमंत्र्यांवर टीका करणे योग्य नाही, असे रामदास आठवले म्हणाले. रिपब्लिकन पक्षाची ताकद आहे, ती ताकद कार्यकर्त्यांनी दाखवली पाहिजे. प्रत्येक वेळी मित्र पक्षाच्या मागे लागायचे नाही. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत आपले ताकद दाखवली पाहिजे. मतदान मिळवता आले पाहिजे. आपले लोक निवडुन आणता आले पाहिजे. त्यासाठी पक्ष बांधणी करा, सर्व समाज घटकांना सोबत घेवुन पक्ष मजबुत करा, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले.

Comments
Add Comment

पुण्यातील २२ वर्षीय तरुणी कॉलेजसाठी निघाली, पण परतलीच नाही... 'तो' ईमेल वाचून पालकांना बसला धक्का

पुण्यातील २२ वर्षांची तरुणी आपल्या प्रियकरासोबत पळून गेल्याची घटना उघडकीस आली आहे. बीएससी कॉम्प्युटर

Bullet Train News : बुलेट ट्रेन प्रकल्पाची मोठी झेप : साबरमती नदीवर उभारला ४८० मीटर लांब अन् ३६ मीटर उंच भव्य पूल

अहमदाबाद : देशातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन (Mumbai Ahemdabad Bullet Train)  प्रकल्पाच्या कामाला वेगाने गती मिळत असून, या

Nagpur Water Cut: नागपूर शहरात मंगळवारी पाणीपुरवठा बंद, कोणत्या भागांना बसणारा फटका? वाचा यादी

नागपूर: नागपूर शहरामध्ये काही परिसरांमध्ये येत्या आठवड्यात पाणी पुरवठा बंद असणार आहे. शहराला पाणी पुरवठा केल्या

'गर्जना मोर्चा नव्हे ही तर कोल्हेकुई' - ॲड. आशिष शेलारांचा विरोधकांवर हल्लाबोल

निवडणुकीत विजय मिळाला तर ईव्हीएम आणि निवडणूक आयोग योग्य, मात्र पराभव झाला की त्याच निवडणूक आयोगावर आणि

'महिला शेतकरी सक्षमीकरण कायदा २०२६': शेतात राबणाऱ्या हातांना मिळाला 'शेतकरी' म्हणून कायदेशीर दर्जा

राज्य सरकारच्या वतीने महाराष्ट्रात महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने एक महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे. २

Tree Cutting : सिध्दार्थ नगरमधील इमारत पुनर्विकासात ३७ झाडे बाधित

तब्बल १७ कापणार, २० पुनर्रोपित करणार या बदल्यात ६८७ झाडे लावली जाणार आहे, या झाडांचे रोपण प्रकल्पाच्या ठिकाणी