IAS Officer Transfer: CM देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय, राज्यातील तीन बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई: राज्य सरकारने सोमवारी तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. काही वेळापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी तीन वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत. संजय खंदारे, संजय यादव आणि वैष्णवी बी या तिन्ही अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्याचे आदेश देण्यात आले आहे.


वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांची कुठे बदली करण्यात आली?



  • संजय खंदारे (Sanjay Khandare- IAS:RR:1996) यांची पर्यटन विभागाचे अप्पर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई येथून त्यांची अप्पर मुख्य सचिव (वन), वन विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर बदली करण्यात आली आहे.

  • संजय यादव (Sanjay Yadav- IAS:SCS:2009) यांची समग्र शिक्षा अभियान, मुंबईचे राज्य प्रकल्प संचालक पदावरून त्यांची सचिव (पर्यटन), पर्यटन विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर बदली करण्यात आली आहे.

  • वैष्णवी बी. (Vaishnavi B- IAS:RR:2019) यांची अप्पर विभागीय आयुक्त, नागपूर विभाग, नागपूर या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.




संजय खंदारे हे 1996 च्या तुकडीतील भारतीय प्रशासकीय सेवेचे (आयएएस) अधिकारी आहेत. ते सध्या पर्यटन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होते. त्यांच्या नव्या नियुक्तीनुसार ते आता वन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाची जबाबदारी सांभाळतील. 2009 च्या तुकडीतील आयएएस अधिकारी संजय यादव हे समग्र शिक्षा अभियानाचे राज्य प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत होते. त्यांची पर्यटन विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, 2019 च्या तुकडीतील आयएएस अधिकारी वैष्णवी बी. यांची नागपूर विभागाच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Comments
Add Comment

Eknath Shinde On Smit Machchhar: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कॅप्टन स्मित यांचे कौतुक; म्हणाले...

मुंबई: दुबईहून इस्त्राईलकडे जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' कंपनीच्या विमानामध्ये सह वैमानिकाने कॅप्टन स्मित मच्छार

Eastern Freeway News: ठाण्यातून 20 मिनिटांत मुंबई गाठता येणार, ईस्टर्न फ्रीवेवरून प्रवास सुसाट, कधी सुरु होणार नवा मार्ग?

मुंबई: मुंबई- ठाणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कायमच वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. विशेषत: नोकरदारांना या

BMC Air Pollution Control: मुंबईत वायू प्रदूषणाविरोधात बीएमसीची धडक मोहीम; हॉटस्पॉट्सवर विशेष लक्ष

मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने ‘वायू प्रदूषण नियंत्रण व अंमलबजावणी कृती

Marathi Language Rule : स्थगितीची मुदत संपताच ‘मराठी’ सक्तीची!

- १८ ऑगस्ट २०२७ नंतर नियमभंग झाल्यास कारवाई; अमराठी चालकांना परिवहनमंत्री सरनाईकांचा इशारा मुंबई : व्यवहारिक

….चला,विहिर खोदूया!

सचिन धानजी आपल्याकडे एक म्हण आहे ‘तहान लागल्यानंतर विहिर खोदायची’… या उक्तीचा प्रत्यय सध्या तरी आपल्याला येत

Navi Mumbai Water Cut: नवी मुंबईत 16 तास पाणीपुरवठा बंद, कोणकोणत्या परिसराला फटका बसणार? वाचा यादी

नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये येत्या मंगळवारी पाणीपुरवठा विषयक कामे हाती घेण्यात येणार