Eknath Shinde On Smit Machchhar: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कॅप्टन स्मित यांचे कौतुक; म्हणाले...

मुंबई: दुबईहून इस्त्राईलकडे जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' कंपनीच्या विमानामध्ये सह वैमानिकाने कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर प्राणघातक हल्ल्याची 30 सप्टेंबरला घटना घडली. चाकु हल्ल्यामध्ये स्मित रक्तरंजित झाले होते. या हल्ल्यामध्ये त्यांनी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले. कॅप्टन मच्छार यांनी गंभीर जखमी अवस्थेतही प्रसंगावधान राखत कॉकपिटचे दार उघडले. त्यामुळे विमानातील इतरांना हल्लेखोराला रोखता आले आणि विमान सुरक्षितपणे उतरविण्यात यश आले. त्यांच्या या धाडसाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतुक केले.


प्रवाशांचा जीव सुखरूप पद्धतीने वाचवणाऱ्या स्मित मच्छार यांचे जगभरातून कौतुक केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रातील आणि राज्यातील अनेक मंत्र्यांनी स्मित यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. असे असताना आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कॅप्टन स्मित मच्छार यांचे कौतुक केले आहे.




उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?


मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “कॅप्टन स्मित मच्छार यांनी 174 नागरिकांचे प्राण वाचविले. ही केवळ एका वैमानिकाच्या शौर्याची घटना नाही, तर संपूर्ण देशासाठी अभिमानाचा क्षण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम त्यांच्या शौर्याचे कौतुक केले. त्यावेळी कॅप्टन मच्छार यांनीही पंतप्रधान मोदी यांना आपला आदर्श आणि प्रेरणास्थान मानत असल्याचे सांगितले. जगभरातून ज्यांच्या शौर्याचे कौतुक होत आहे, तेच कॅप्टन मच्छार भारताच्या पंतप्रधानांच्या कार्याचा गौरव करतात, ही बाब विशेष आहे. संकटाच्या क्षणी धैर्य, प्रसंगावधान आणि कर्तव्यनिष्ठा दाखविणाऱ्या या वैमानिकाने भारताची मान उंचावली आहे,” असे शिंदे यांनी नमूद केले.


पंतप्रधान मोदी यांनी कॅप्टन मच्छार यांच्याशी झालेल्या संवादात त्यांच्या धैर्याचे आणि प्रसंगावधानाचे कौतुक केले होते. गंभीर जखमी असूनही त्यांनी स्वतःच्या जीवापेक्षा प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिल्याचे मोदी यांनी सांगितले. “भारताची ओळख प्राण घेणाऱ्या नव्हे, तर प्राण वाचविणाऱ्या संस्कृतीची आहे. कॅप्टन मच्छार यांनी आपल्या कृतीतून हीच भारतीय मूल्ये जगासमोर सिद्ध केली आहेत. त्यांच्या शौर्यामुळे भारतीय वैमानिकांची प्रतिष्ठाही जगभरात अधिक उंचावली आहे,” असे शिंदे म्हणाले. कॅप्टन मच्छार यांच्या धाडसी निर्णयामुळे मोठी दुर्घटना टळली. त्यांच्या शौर्याची दखल भारतासह आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जात असून, देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. “कॅप्टन मच्छार यांचे धैर्य, पंतप्रधान मोदी यांनी केलेले कौतुक आणि त्यांच्याबद्दल कॅप्टन मच्छार यांनी व्यक्त केलेला आदर हा भारताच्या नेतृत्वावर आणि मूल्यांवर असलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे. अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचा देशाला अभिमान आहे,” असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

IAS Officer Transfer: CM देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय, राज्यातील तीन बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई: राज्य सरकारने सोमवारी तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

Eastern Freeway News: ठाण्यातून 20 मिनिटांत मुंबई गाठता येणार, ईस्टर्न फ्रीवेवरून प्रवास सुसाट, कधी सुरु होणार नवा मार्ग?

मुंबई: मुंबई- ठाणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कायमच वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. विशेषत: नोकरदारांना या

BMC Air Pollution Control: मुंबईत वायू प्रदूषणाविरोधात बीएमसीची धडक मोहीम; हॉटस्पॉट्सवर विशेष लक्ष

मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने ‘वायू प्रदूषण नियंत्रण व अंमलबजावणी कृती

Marathi Language Rule : स्थगितीची मुदत संपताच ‘मराठी’ सक्तीची!

- १८ ऑगस्ट २०२७ नंतर नियमभंग झाल्यास कारवाई; अमराठी चालकांना परिवहनमंत्री सरनाईकांचा इशारा मुंबई : व्यवहारिक

….चला,विहिर खोदूया!

सचिन धानजी आपल्याकडे एक म्हण आहे ‘तहान लागल्यानंतर विहिर खोदायची’… या उक्तीचा प्रत्यय सध्या तरी आपल्याला येत

Navi Mumbai Water Cut: नवी मुंबईत 16 तास पाणीपुरवठा बंद, कोणकोणत्या परिसराला फटका बसणार? वाचा यादी

नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये येत्या मंगळवारी पाणीपुरवठा विषयक कामे हाती घेण्यात येणार