पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली देश जेव्हा 2047 पर्यंत ‘विकसित भारत’ बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून वाटचाल करत आहे, तेव्हा या संपूर्ण प्रवासात मुंबईचे योगदान नेहमीच सर्वात महत्त्वाचे आणि अग्रणी राहील, असा ठाम विश्वास भाजप मुंबईचे अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत नुकत्याच झालेल्या अभूतपूर्व पायाभूत बदलांची आणि भविष्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विकासाची प्रचिती थेट डिजिटल जगतातील शिलेदारांना यावी, यासाठी भाजप मुंबईच्या वतीने एक अनोखा ‘मुंबई डेव्हलपमेंट टूर’ आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्याच्या सांगता प्रसंगी आयोजित कार्यक्रमात आमदार साटम यांनी उपस्थित सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि कंटेंट क्रिएटर्सशी संवाद साधताना मुंबईच्या प्रगतीचा नवा रोडमॅप मांडला.
पंतप्रधानांच्या ‘सेवा संकल्प अभियान’ आणि ‘विकसित भारत @2047’ या संकल्पनेला डिजिटल माध्यमांची ताकद जोडण्यासाठी भाजप मुंबईचे सचिव प्रतीक कर्पे आणि सोशल मीडिया संयोजक नचिकेत सहस्त्रबुद्धे यांच्या संकल्पनेतून हा विशेष दौरा आखण्यात आला होता. मुंबईची बदलती वाहतूक व्यवस्था, गतिमान कनेक्टिव्हिटी आणि आधुनिक पायाभूत सुविधांचा नागरिकांच्या जीवनमानावर होणारा सकारात्मक परिणाम थेट जनतेपर्यंत पोहोचवणे हा यामागचा मुख्य हेतू होता.
या डिजिटल विकासदौऱ्याची सुरुवात सिद्धिविनायक गणपती मंदिरातील दर्शनाने झाली. अंडरग्राउंड मेट्रोच्या ‘ॲक्वा लाईन’ने सिद्धिविनायक ते चर्चगेट असा प्रवास करत मुंबईच्या आधुनिक सार्वजनिक वाहतुकीचा वेग अनुभवला. प्रवासाचा पुढील टप्पा देशाची शान असलेल्या भव्य ‘अटल सेतू’वरून झाला, जिथून हा ताफा थेट आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या धावपट्टीजवळ पोहोचला. आधुनिकतेचा हा वेध घेतल्यानंतर क्रिएटर्सनी मुंबईच्या ऐतिहासिक वारशाची साक्ष देणाऱ्या एशियाटिक सोसायटीच्या ग्रंथालयालाही भेट दिली. या दौऱ्याचा नेत्रदीपक समारोप मुंबईच्या किनारपट्टीचे रूप पालटणाऱ्या भव्य ‘कोस्टल रोड’वरून प्रवास करत वरळी प्रोमेनेड येथे झाला.
उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याची मुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे विनंती मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा ...
वरळी प्रोमेनेड येथील संवादात आमदार साटम यांनी मुंबईच्या भौतिक विकासासोबतच येथील मानवी पैलूंवरही प्रकाश टाकला. मुंबईच्या प्रसिद्ध ‘स्पिरिट’चा गौरव करताना त्यांनी 26 जुलैच्या महापुराची आठवण काढली. संकटाच्या काळात जात, धर्म विसरून रस्त्यावर उतरत एकमेकांना मदत करणे हीच मुंबईची खरी ताकद असल्याचे ते म्हणाले. यासोबतच मुंबईकरांच्या हक्काच्या घराच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी वरळी आणि शिवडी येथील बीडीडी चाळ पुनर्विकासाचे उदाहरण दिले. मूळ रहिवाशांना त्यांच्या हक्काच्या हद्दीतच आधुनिक घरे मिळवून देण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.