एमपीएससीचे आजी-माजी अध्यक्ष, सदस्यांच्या चौकशीसाठी समिती - कलम ३१७नुसार कारवाईची शिफारस

उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याची मुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे विनंती

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कामकाजाबाबत विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर आयोगाचे माजी व विद्यमान अध्यक्ष तसेच सदस्य यांच्याविरोधात संविधानाच्या कलम ३१७नुसार कार्यवाही करण्यासाठी समिती गठीत करण्याची शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्याकडे केली आहे. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून तिच्याकडून तीन महिन्यांत अहवाल मागवावा आणि त्यातील निष्कर्षांच्या आधारे पुढील कार्यवाही करावी, अशी विनंती करण्यात आली आहे.

एमपीएससीच्या परीक्षा आणि आयोगाच्या कामकाजाबाबत विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आंदोलन सुरू आहे. आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी भूमिका घेतली असून या आंदोलनाला विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही पाठिंबा दिला आहे. यापूर्वी ३० सप्टेंबरला मुख्यमंत्री फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली होती. त्या वेळी आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य हे संवैधानिक पदावर असल्याने त्यांच्यावरील कारवाईसाठी संविधानातील कलम ३१७नुसार प्रक्रिया राबविण्याचे आश्वासन देण्यात आले होते.



राज्य सरकारला एमपीएससीच्या अध्यक्ष किंवा सदस्यांना पदावरून दूर करता येत नसल्याने संविधानातील तरतुदीनुसार पुढील प्रक्रिया करण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली होती. आता त्याच अनुषंगाने राज्यपालांकडे समिती गठीत करण्याची शिफारस करण्यात आली आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर त्यातील निष्कर्षांच्या आधारे पुढील निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, सरकारने यापूर्वी एमपीएससीच्या परीक्षा ऑफलाइन घेणे, सचिवांची बदली आणि भरती प्रक्रियेला गती देण्यासह विविध निर्णय जाहीर केले आहेत.
Comments
Add Comment

Nitesh Rane in Amravati: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नितेश राणेंची आढावा बैठक; तलावातील गाळ काढण्याचे निर्देश

यंदा पावसाने तीन दडी मारल्याने संपूर्ण राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या दुष्काळाच्या

Nitesh Rane : मच्छीमारांचे प्रस्ताव प्रलंबित ठेवल्याने मंत्री नितेश राणेंकडून अधिकाऱ्यांची खरडपट्टी

- १ हजार ३०७ पैकी फक्त ८२ प्रस्ताव मंजूर; दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेताना मत्स्यव्यवसायमंत्री संतापले वाशिम :

राज्यातील सर्व शहरांत १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणीकपात - ३१ ऑगस्ट २०२७पर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन

मुंबई : एल निनोच्या प्रभावामुळे राज्यात यंदा पर्जन्यमानात घट झाल्याने उपलब्ध जलसाठ्याचे काटेकोर नियोजन

दुष्काळात मच्छिमारांना दिलासा देण्यासाठी तलावांतील गाळ प्राधान्याने काढणार - मंत्री नितेश राणे यांची ग्वाही

मुंबई : "राज्यात मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा देण्यात आला असल्याने दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांप्रमाणेच

उजनी धरणावरील खासगी मासेमारीचा ठेका रद्द

मुंबई : उजनी धरणावरील खासगी मासेमारी ठेक्याची ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Chandrashekhar Bawankule : कर्जवसुलीच्या दबावामुळे शेतकऱ्याने आत्महत्या केल्यास बँकांना जबाबदार धरणार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचे नियोजन मुंबई