Monday, October 5, 2026

OPPO F35 Series भारतात लाँच; 8,000mAh बॅटरीसह दमदार फीचर्स!

OPPO F35 Series भारतात लाँच; 8,000mAh बॅटरीसह दमदार फीचर्स!
टेकप्रेमींसाठी आनंदाची बातमी! Oppo ने नुकतीच आपली F35 सिरीज भारतात लाँच केली आहे. या नवीन सिरीजमध्ये Oppo F35 5G आणि Oppo F35 Pro 5G यांचा समावेश आहे. भारतातील 'F' सिरीजची 10 वर्षे पूर्ण झाल्याचे हे नवीन स्मार्टफोन्स प्रतीक आहेत. कॅमेरा, बॅटरी लाईफ व टिकाऊपणा ही या स्मार्टफोन्सची वैशिष्ट्ये आहेत. Oppo F35 5G आणि Oppo F35 Pro 5G या दोन्ही मॉडेलमध्ये 100-डिग्री फील्ड ऑफ व्ह्यू असलेला 50 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड अँगल फ्रंट कॅमेरा आणि Oppo चे नॅचरल टोन 2.0 हे तंत्रज्ञान आहे. Oppo F35 सिरीजची भारतात किंमत किती? 6 GB RAM आणि 128 GB स्टोरेज असलेल्या Oppo F35 5G ची किंमत भारतात 38,999 आहे तर 8 GB RAM आणि 128 GB स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत 42,999 रुपये आहे. तर Oppo F35 Pro 5G या मॉडेलमधील 6 GB RAM आणि 128 GB स्टोरेज असलेल्या मोबाईलची किंमत 45,999 पासून सुरु होते. यातील 8 GB RAM आणि 128 GB स्टोरेज असलेल्या मोबाईलची किंमत ही 49,999 आहे तर 8 GB RAM आणि 256 GB स्टोरेज असलेल्या मोबाईलची किंमत 54,999 आहे.
11 ऑक्टोबर पासून हे मोबाईल फोन्सवर रिटेल दुकानांमध्ये तसेच OPPO च्या भारतातील ऑनलाईन दुकानांमध्ये आणि Flipkart, Amazon वर सेल सुरु होणार आहे. OPPO F35 5G मॉडेल वेव्ह ब्लू, टायटॅनियम ग्रे आणि मिस्ट पिंक; तर F35 Pro 5G सनराईज ऑरेंज, ट्वायलाइट ब्राउन आणि वेव्ह ब्लू रंगांमध्ये उपलब्ध आहे. या फोन्समध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देखील देण्यात आला आहे, तर OPPO F35 Pro 5G मध्ये फ्रंट आणि रिअर अशा दोन्ही कॅमेऱ्यांमधून 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट मिळतो. F35 सिरीजमध्ये 8,000 mAh ची बॅटरी देण्यात आली असून, ती 80W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हे स्मार्टफोन्स धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी IP66, IP68, IP69 आणि IP69K रेटिंगसह येतात. दोन्ही मॉडेल्स Android 17 वर आधारित ColorOS 17 वर चालतात आणि विविध रॅम (RAM) व स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत. OPPO F35 Pro 5G मध्ये 256 GB पर्यंतचे अंतर्गत स्टोरेज मिळते.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >