Saturday, October 3, 2026

Vivo V80 Phone: 7200mAh दमदार बॅटरी, 144Hz डिस्प्लेसह विवोचा नवा 5G फोन येतोय; भारतात केव्हा लाँच होणार?

Vivo V80 Phone: 7200mAh दमदार बॅटरी, 144Hz डिस्प्लेसह विवोचा नवा 5G फोन येतोय; भारतात केव्हा लाँच होणार?

मुंबई: जर तुम्ही नवा मोबाईल घेण्याच्या विचारात असाल तर, थांबा... Vivo कंपनीकडून V सीरीजमधील एक नवा कोरा मोबाईल लाँच करण्यात येत आहे. त्यामुळे जर तुम्ही दसरा किंवा दिवाळीच्या मुहूर्तावर नवीन मोबाईल विकत घेण्याच्या विचारात असाल, तर हा नवीन मोबाईल तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. Vivo कंपनीकडून बाजारामध्ये दमदार फिचर्स असणारे मोबाईल लॉंच करण्यात येतात. त्याचपैकी ही एक V सीरीज म्हणता येईल. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मार्केटमध्ये, Vivo कंपनीने Vivo V80 हा स्मार्टफोन बाजारामध्ये लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन लाँच करण्यापूर्वी, कंपनीकडून फोनची डिझाईन, डिस्प्ले, कॅमेरा आणि बॅटरीसह इतरत्र स्पेसिफिकेशनची माहिती कंपनीने शेअर केलेली आहे.

Vivo V80 मध्ये युजर्सला Zeiss च्या ब्रँडेड कॅमेऱ्याची सिस्टिम देण्यात आली आहे. कोल्ड कर्व्हड ग्लासची डिझाईन या स्मार्टफोनला देण्यात आलेली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अपकमिंग Vivo V80 या स्मार्टफोनची किंमत भारतात जवळपास 60,000 च्या जवळपास असण्याची शक्यता आहे. 8GB Ram असलेला हा फोन वेगवेगळ्या स्टोरेज व्हेरिएंटमध्ये ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. 8GB Ram+ 128GB स्टोरेज व्हेरिएंट मोबाईलची किंमत 60,000 इतकी असण्याची शक्यता आहे. तर, 8GB Ram+ 256GB व्हेरिएंट मोबाईलची किंमत 70,000 आणि 8GB Ram+ 512GB व्हेरिएंट मोबाईलची किंमत 80,000 इतकी असण्याची शक्यता आहे. ह्या किंमतीमध्ये काही प्रमाणावर बदल होण्याची शक्यता आहे.

Vivo V80 हा स्मार्टफोन येत्या 6 ऑक्टोबरला भारतात लाँच होणार आहे. Vivo V80 या स्मार्टफोनचा 6.59 इंचाचा 1.5K OLED डिस्प्ले आहे. या स्क्रीनला 144Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. डिस्प्लेला 1.5k इतका रिझोल्युशन सपोर्ट करतो, तर त्याची पीक ब्राइटनेस 5,000 निट्स असल्याचे कंपनीने सांगितले आहे. हाय रिफ्रेश रेट आणि ब्राइट डिस्प्लेमुळे गेमिंग, व्हिडिओ स्ट्रीमिंग तसेच बाहेरच्या प्रकाशात फोन वापरताना चांगला अनुभव मिळण्याची अपेक्षा आहे. या डिव्हाइसमध्ये युजर्सला 90W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7,200mAh बॅटरी असेल हे निश्चित झाले आहे. शिवाय, ह्या डिव्हाइससाठी OriginOS 7 हे व्हर्जन असेल. सिंगल चार्जमध्ये हा फोन तुम्ही जवळपास 14 तास सतत वापरू शकणार आहेत.

युजर्सला फोटोग्राफीसाठी Vivo V80 मध्ये ZEISS ब्रँडेड कॅमेरा सिस्टम देण्यात आला आहे. मागच्या बाजूचा 50MP प्रायमरी कॅमेरा देण्यात आला असून, 50MP नाइट टेलिफोटो कॅमेरा आणि ZEISS वाइड-अँगल कॅमेरा मिळेल. सेल्फी कॅमेरा 50MP चा आहे. जो ग्रुप सेल्फीसाठी खूप खास असेल. या कॅमेऱ्यात 92-डिग्री फील्ड ऑफ व्ह्यू आणि ऑटोफोकस सपोर्ट मिळणार आहे. युजर्सचे Portait Mode मधील फोटो खूप खास येतील, यामध्ये काही शंका नाहीच. हा मोबाईल पाठीमागच्या बाजूने काहीसा IPhone सारखा दिसतो. सनराईज अँथम, होरायझन ब्लू आणि स्टेलर ब्लॅक अशा तीन रंगांमध्ये युजर्सला हा मोबाईल उपलब्ध होणार आहे.

Vivo कंपनीने अद्याप V80 मध्ये कोणत्या चिपसेटचा वापर करण्यात आलेला आहे, हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. मात्र, रिपोर्टनुसार या डिव्हाइसमध्ये Snapdragon 7 Gen 4 चिपसेट असण्याची शक्यता आहे. सॉफ्टवेअरच्या बाबतीत Android 17 आधारित OriginOS 7 वर हा मोबाईल काम करेल. त्यामुळे नवीन सॉफ्टवेअर फीचर्ससोबत आधुनिक यूजर इंटरफेसचा अनुभव मिळण्याची अपेक्षा आहे. अद्याप तरी मोबाईलच्या लाँचची डेटच समोर आली आहे. नेमका Vivo V80 हा स्मार्टफोन केव्हा भारतात रिलीज होणार? याची माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे अनेक युजर्सचे लक्ष या मोबाईलच्या किंमतीकडे आणि लाँचिंगच्या अधिकृत तारखेकडेच आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >