Sanjay Dutt : बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आपल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. शेखर सुमन यांच्या ‘शेखर टूनाइट’ या चॅट शोच्या गांधी जयंती विशेष भागात संजय दत्तने देशातील शांततेबाबत केलेल्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर चर्चा रंगली. या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादानंतर आता अभिनेत्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संजय दत्तने आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले की, कोणत्याही व्यक्ती, समाज किंवा संस्थेच्या भावना दुखावण्याचा अथवा त्यांचा अनादर करण्याचा आपला हेतू नव्हता. त्याचे वक्तव्य हे शोमधील एका स्क्रिप्टेड संवादाचा भाग होते आणि त्यामागे केवळ मनोरंजन व हलकाफुलका विनोद करण्याचा उद्देश होता, असे त्याने सांगितले.
भावना दुखावण्याचा हेतू नव्हता
संजय दत्तने म्हटले की, आपल्या वक्तव्यामुळे कोणत्याही व्यक्ती, समाज किंवा संस्थेच्या भावना दुखावण्याचा अथवा त्यांचा अवमान करण्याचा आपला हेतू कधीच नव्हता, आपले वक्तव्य हे पूर्वनियोजित आणि विनोदी संवादाच्या संदर्भात करण्यात आले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले. आपल्या वक्तव्यामागील उद्देश हलक्याफुलक्या आणि विनोदी पद्धतीने संवाद साधण्याचा होता. चित्रपटांमध्ये पाहायला मिळणाऱ्या विनोद आणि उपरोधाच्या धर्तीवर हा संवाद करण्यात आला होता, विशेषतः ‘मुन्नाभाई’ या चित्रपटातील ‘गांधीगिरी’च्या संकल्पनेचा संदर्भ देत, प्रेम, आपुलकी, एकोपा आणि सद्भावनेचा संदेश देणे हा त्यामागील उद्देश होता,
मात्र, आपल्या वक्तव्याचा मूळ संदर्भ बाजूला राहून त्याचा वेगळा अर्थ घेतला गेल्याचे त्याने म्हटले आहे. कोणाचाही अपमान किंवा भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचे पुन्हा स्पष्ट करत, आपल्या वक्तव्याकडे त्यामागील मूळ संदर्भ आणि हेतू लक्षात घेऊन पाहावे, असे आवाहन त्याने केले आहे. संजय दत्तने सांगितले की, हा संवादही त्याच धर्तीवर हलक्याफुलक्या आणि सकारात्मक पद्धतीने करण्यात आला होता. मात्र, त्याच्या बोलण्याचा संदर्भ चुकीच्या पद्धतीने घेतला गेल्याचे त्याने म्हटले आहे. अभिनेत्याने ‘एक्स’वरील पोस्टसोबतच आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवरूनही स्पष्टीकरण दिले आहे.
पहा व्हिडिओI would like to clarify that it was never my intention to hurt, offend, or disrespect the sentiments of any individual, community, or institution.
My remarks were made in the context of a scripted conversation intended to be light-hearted and humorous. The spirit behind them was similar to the humour and satire seen in films like Munna Bhai, particularly the concept of 'Gandhigiri,' which was intended to convey a message of love, warmth, togetherness, and goodwill. Unfortunately, my words were interpreted outside of that intended context. — Sanjay Dutt (@duttsanjay) October 4, 2026
Sanjay Dutt: "Ek peace hona chahiye, I can’t feel that peace anymore in India."
But what kind of "peace" is he talking about? If there is no peace in India, then where is it? In our neighbouring countries? https://t.co/IKl8xHK3eJ — Amit Kumar Sindhi (@AMIT_GUJJU) October 3, 2026
नेमका वाद कशामुळे झाला ?
शेखर सुमन यांच्या शोमध्ये संजय दत्तला देशातील शांततेबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी त्याने भारतात आणखी शांतता असावी, अशी इच्छा व्यक्त केली. पूर्वी जाणवत असलेली शांतता आता तितकीशी जाणवत नसल्याचेही त्याने म्हटले होते. भारताचे लोक मनमिळावू आणि अतिथीप्रेमी असल्याचे सांगताना संजय दत्तने भगवान शिवाकडे जुने दिवस पुन्हा परत यावेत, अशी प्रार्थना करत असल्याचे म्हटले होते. त्याच्या या वक्तव्याचे व्हिडिओ आणि प्रतिक्रिया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आले.






