
शेवटच्या क्षणी रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना तात्काळ तिकीट चुकली किंवा रेल्वेचा चार्ट तयार झाल्यावर आपल्याला आता तिकीट मिळणारच नाही असं वाटणं साहजिक आहे. पण रेल्वेच्या या सुविधेमुळे आता ऐनवेळी तिकीट मिळणं देखील शक्य झालं आहे. सणासुदीचे दिवस असले किंवा लॉँग विकेंड असला की बाहेर जाण्यासाठी एक्सप्रेस ट्रेनची तिकीट काढणं म्हणजे कसरतच असते. वेटिंग लिस्टमध्ये नाव आलं की तिकीट कन्फर्म कधी होतेय याचं टेन्शन. त्यात चार्ट तयार झाल्यावर आता आपली तिकीट कन्फर्म होणारच नाही असंच वाटत असतं. पण रेल्वेने प्रवाशांसाठी दिलेल्या 'करंट बुकिंग' या पर्यायामुळे प्रवासी शेवटच्या क्षणी देखील कन्फर्म तिकीट मिळवू शकतात.
करंट बुकिंगमुळे प्रवाशांना चार्ट तयार झाल्यानंतर RAC किंवा वेटिंग नाही तर कन्फर्म तिकीट मिळण्याची १०० टक्के खात्री आहे. आयआरसीटीसीची करंट बुकिंग ही सुविधा प्रवाशांना आरक्षण तक्ता तयार झाल्यानंतर निश्चित झालेल्या रिक्त जागा बुक करण्याची परवानगी देते. 'चार्ट्स व्हॅकंट या सुविधेद्वारे उपलब्ध असलेली ही सेवा प्रवाशांना सीटची उपलब्धता तपासण्याची आणि जागा उपलब्ध असल्यास बुक करण्याची सुविधा देते.
नाशिक : परराज्यातून आणलेली खासगी वाहने महाराष्ट्रात विनानोंदणी वर्षानुवर्षे वापरणाऱ्या वाहनमालकांची आता खैर नाही. मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन ...
करंट बुकिंग कसे करता येते?
पहिला आरक्षण तक्ता हा ट्रेनच्या वेळेच्या चार तास आधी तयार होतो. आरक्षण तक्ता तयार झाल्यावरदेखील काही जागा या रिक्त राहू शकतात. या जागा करंट बुकिंगद्वारे प्रवाशांना दिल्या जाऊ शकतात. ट्रेन सुटण्याच्या ५ मिनिटे आधीपर्यंत प्रवाशांना या रिक्त जागा आरक्षित करता येऊ शकतात. विशेष म्हणजे या तिकीट कन्फर्म तिकीट म्हणूनच प्रवाशांना मिळतात. विशेष म्हणजे, तात्काळ किंवा प्रीमियम तात्काळ तिकीटसाठी लागणार अतिरिक्त भाडे या बुकींगवर लागू होत नाही. तसेच काही गाड्यांच्या बाबतीत IRCTC या तिकिटावर १० ते १५ टक्के सूटदेखील देऊ शकते.
तिकीट तपासण्याच्या पायऱ्या -
१) IRCTC वेबसाईट किंवा ॲपवर लॉग इन करा. २) ट्रेन संबंधित सेवांखालील चार्ट्स व्हॅकंट या पर्यायावर जा. ३) उपलब्ध डबे आणि जागा पाहण्यासाठी ट्रेन नंबर आणि तारीख टाका. ४) कोच आणि बदलेल्या रिकाम्या जागा तपासा. ५) जागा उपलब्ध असल्यास वेबसाईट किंवा ॲपद्वारे बुकिंग करा.






