बेस्ट वीज उपकेंद्रासाठी सॉल्ट पॅनची जागा, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून महसूल मंत्री बावनकुळे यांचा निर्णय

मुंबईतील सॉल्ट पॅन महसूल विभागातील 132 चौरस मीटर शासकीय जागा बेस्ट उपक्रमाला वीज वितरण उपकेंद्र उभारण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला गेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर महसूलमंत्र्यांनी त्याला हिरवा कंदील दाखवला आहे.

मुंबईतील सॉल्ट पॅन महसूल विभागातील 132 चौरस मीटर शासकीय जागा बेस्ट उपक्रमाला वीज वितरण उपकेंद्र उभारण्यासाठी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यामुळे परिसरातील वीज पुरवठा यंत्रणा अधिक सक्षम आणि बळकट होण्यास मोठी मदत होणार आहे. शासनाने या हस्तांतरणासाठी काही महत्त्वाच्या अटी व शर्ती लागू केल्या आहेत. या अटींनुसार, संबंधित जमीन केवळ आणि केवळ वीज उपकेंद्र उभारण्याच्या उद्देशासाठीच वापरता येणार आहे. इतर कोणत्याही कारणांसाठी वापर करता येणार नाही.

महसूल विभागाने घेतलेल्या या निर्णयानुसार, सॉल्ट पॅन महसूल क्षेत्रातील भूखंड क्रमांक 83 मधील 132 चौ.मी. क्षेत्रफळाची शासकीय जमीन बेस्ट उपक्रमाला दिली जाणार आहे. पण जमिनीचा मालकी हक्क हा शासनाकडेच असणार आहे. वाढत्या नागरीकरणामुळे विजेची मागणी सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, स्थानिक भागातील विद्युत वितरण व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आणि नागरिकांना अखंडित व उच्च दाबाचा वीज पुरवठा करण्यासाठी येथे नवीन वीज वितरण उपकेंद्र उभारण्याची आवश्यकता होती.सॉल्ट पॅन आणि आसपासच्या परिसरातील वाढती लोकसंख्या, गृहप्रकल्प आणि व्यावसायिक आस्थापना लक्षात घेता हा निर्णय अत्यंत दिलासादायक ठरणार आहे.



या नवीन उपकेंद्रामुळे तांत्रिक बिघाड, विजेचा कमी-अधिक दाब आणि भारनियमन यांसारख्या समस्या सुटण्यास मदत होईल. एकूणच, स्थानिक विद्युत पायाभूत सुविधांचा विकास करणाऱ्या या निर्णयाचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.
Comments
Add Comment

मुंबईत ८ आणि ९ ऑक्टोबरला सायरन वाजणार! नागरिकांनी घाबरून न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन

देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहराच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन व विविध

मुंबईत लांब पल्ल्याच्या गाड्या वाढणार; ग्रँट रोड अन् लोअर परेल येथील जुन्या भूखंडांचा पश्चिम रेल्वेकडून होणार कायापालट

ग्रँट रोडवरील ब्रिटिशकालीन जुना पार्सल डेपो आणि करी रोड व लोअर परेल स्थानकांदरम्यानचा एक विस्मृतीला गेलेला

CSR for Child Nutrition : गरीब वस्त्यांमधील मुलांपर्यंत पोषण पोहोचविण्यासाठी सीएसआर भागीदारीचा वापर गरजेचा

प्रशासनातील अनावश्यक टप्पे कमी करणे ‘बिझनेस प्रोसेस रिइंजिनिअरिंग’ची आवश्यकता मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई

Central Railway Project : मध्य रेल्वेच्या ५ आणि ६व्या लाईनच्या प्रकल्प कामाला गती

माटुंगा वर्कशॉप परिसरातील ४२ झाडे बाधित वृक्ष प्राधिकरणाची परवानगी मुंबई (विशेष प्रतिनिधी) मध्य रेल्वेच्या ५

Bhandup: भांडुप संकुलातील नवीन जलशुध्दीकरणाच्या बांधकामांमध्ये ३३४ झाडे बाधित

पर्यायी ४७२० वृक्षांचे रोप आता बदलापूरमधील वन विभागाच्या जागेत करणार वृक्ष प्राधिकरणाने दिली मंजुरी मुंबई

Guinness World Records: ‘महा गणेशमूर्ती कार्यशाळा’ने रचला इतिहास, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स’सर्टिफिकेट प्रदान

मुंबई: पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल