'मी आज आहे उद्या नसेन...' गोव्यातील कार्यक्रमातील नाना पाटेकर यांचे 'ते' शेवटचे भाषण व्हायरल

मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर आणि चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. आपल्या अभिनय कौशल्याने विविध जॉनरच्या चित्रपटांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. गोव्यातील डोना पावला येथील निवासस्थानी असताना नाना पाटेकर यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना तातडीने मणिपाल रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती असून, त्यांचा मुलगा मल्हार पाटेकर यांनी या दुःखाद बातमीला दुजोरा दिला आहे.


निधनाच्या काही दिवसांपूर्वी नाना पाटेकर गोव्यात होते. ४ ऑक्टोबर रोजी त्यांनी डोना पावला येथील 'सम्राट क्लब इंटरनॅशनल'च्या विशेष समारंभाला हजेरी लावली होती. पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि गमचा अशा साध्या पोशाखात त्यांनी मंचावरून उपस्थितांना संबोधित केले होते. आता त्यांच्या याच शेवटच्या भाषणाचा व्हिडिओ (Nana Patekar Last Speech Video) सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.


शेवटच्या भाषणात काय म्हणाले होते नाना पाटेकर?


आपल्या या अंतिम संबोधनात नाना पाटेकरांनी गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांच्या आठवणींना उजाळा दिला होता. मंचावर उपस्थित गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा उल्लेख करत नाना म्हणाले होते, "प्रमोद सावंत गोव्याचे मुख्यमंत्री आहेत. तुमच्या वडिलांच्या काळात मनोहर पर्रीकर हे माझे मित्र होते. अभिमान वाटावा असा माणूस! ते माझ्यापेक्षा वयाने लहान होते, तरीही त्यांचे मोठेपण इतके होते की त्यांच्याकडे आदरानेच पाहावे लागायचे. आपलं नशीब की आपल्या इथे असा माणूस जन्माला आला. त्यांनी जे काम करायचं ठरवलं, ते केलं. वसा घेतल्यासारखी जगलेली ही माणसे आहेत."



आपल्या भाषणात पुढे बोलताना त्यांनी मृत्यू आणि आयुष्याच्या हेतूवर अत्यंत भावूक व गहन विचार मांडले होते. ते म्हणाले, "माणसाला काहीतरी करायचा ध्यास असायला हवा. जायचं आहेच, मीही आज आहे उद्या नसेन... प्रत्येकाला जायचं आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात तो एक काळ येणारच! पण मृत्यूपूर्वी मला जे करायचं आहे, ते मी करू शकतोय का? मी प्रयत्न केले का? माझं जग फक्त माझी मुलं, माझं घर, माझी बायको यापुरतंच मर्यादित असेल, तर माझ्या जगण्याचा उद्देश काय? मग जगा आणि मरा..."


नाना पाटेकरांच्या या विधानाने उपस्थितांच्या मनाला स्पर्श केला होता. आज त्यांच्या अचानक जाण्यानंतर हे शब्द त्यांच्या चाहत्यांच्या डोळ्यात पाणी आणत आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या या शेवटच्या भाषणाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असून, नागरिक व कलाक्षेत्रातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे.

Comments
Add Comment

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या 'त्या' 3 भूमिका अन् 3 नॅशनल अवॉर्ड्स!

नाना पाटेकर आणि 3 राष्ट्रीय पुरस्कार... डॉन ते संशयी पती! 'त्या' 3 भूमिकांचा थरार तुम्हाला माहितीये का? मुंबई :

Nana Patekar passes away : नानांच्या जाण्याने सिनेसृष्टी हळहळली; बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांकडून श्रद्धांजली

Nana Patekar passes away :  हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने सिनेसृष्टीला मोठा धक्का

Nana Patekar : 'आपला माणूस' हरपला! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर काळाच्या पडद्याआड

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 75व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Vijayendra Kumeria Preeti Bhatia Divorced : प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोट, १४ वर्षाच्या सुखी संसारानंतर जोडप्याने घेतला काडीमोड

मुंबई : अभिनेता विजयेंद्र कुमेरिया (Vijayendra Kumaria) यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठी बातमी समोर आली. "नागिन" फेम

एक स्त्री, एक सत्य आणि एक लढा! अभिषेक कंवर दिग्दर्शित ‘जनक’ चित्रपटाचा दमदार मोशन पोस्टर प्रदर्शित !

मराठी चित्रपटसृष्टीत एक नवा आणि उत्कंठावर्धक कोर्टरूम ड्रामा प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाला आहे.

चेक बाउन्स प्रकरणात राजपाल यादव यांना १३ ऑक्टोबरपर्यंत २ कोटी रुपये जमा करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

‘भूल भुलैया’ मधला छोटा पंडित असो, ‘हंगामा’ मधला राजा असो किंवा ‘वेलकम’ मधला तो अतरंगी अभिनेता… राजपाल यादव यांनी