Thursday, October 8, 2026

Instagram MUSE AI feature : Instagram मध्ये आले नवीन 'MUSE' AI फीचर! शेअर मेन्यूमध्ये दिसणारे 'MUSE' काय आहे ? जाणून घ्या एका क्लिकवर!

प्रथमदर्शनी हा पर्याय पोस्ट किंवा रील शेअर करण्यासाठी असावा असे वाटू शकते, मात्र याचा थेट संबंध मेटाच्या (Meta) 'MUSE' या नव्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) एजेंटशी आहे. मेटाने याला युजर्सचा 'पर्सनल एआय एजंट' म्हणून सादर केले आहे. हा केवळ विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणारा साधा चॅटबॉट नसून, युजर्सची रोजची कामे सुलभ आणि व्यवस्थित मॅनेज करणारा एक स्मार्ट असिस्टंट आहे.

इन्स्टाग्राम (Instagram) वापरकर्त्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. सध्या इन्स्टाग्रामच्या शेअर मेन्यूमध्ये युजर्सना 'MUSE' नावाचा एक नवीन पर्याय दिसू लागला आहे. प्रथमदर्शनी हा पर्याय पोस्ट किंवा रील शेअर करण्यासाठी असावा असे वाटू शकते, मात्र याचा थेट संबंध मेटाच्या (Meta) 'MUSE' या नव्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) एजेंटशी आहे. मेटाने याला युजर्सचा 'पर्सनल एआय एजंट' म्हणून सादर केले आहे. हा केवळ विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणारा साधा चॅटबॉट नसून, युजर्सची रोजची कामे सुलभ आणि व्यवस्थित मॅनेज करणारा एक स्मार्ट असिस्टंट आहे.

नेमका काय आहे इन्स्टाग्राममधील

">'MUSE' पर्याय ?

जेव्हा युजर्स इन्स्टाग्रामच्या शेअर मेन्यूवर जाऊन MUSE वर क्लिक करतात, तेव्हा त्यांच्यासमोर 'Muse from Meta' ची अधिकृत ॲप लिस्टिंग उघडते. तिथे या ॲपची ओळख 'युअर पर्सनल एआय एजंट' अशी करून देण्यात आली आहे. दरम्यान, हे फीचर सध्या जगभरातील सर्व युजर्ससाठी टप्प्याटप्प्याने रोलआऊट केले जात आहे. त्यामुळे काही देशांमध्ये किंवा काही युजर्सना हे लगेच वापरण्यासाठी उपलब्ध दिसत आहे, तर काहींना अद्याप याची प्रतीक्षा करावी लागत आहे.

तिकीट बुकिंगपासून ते अर्ज भरण्यापर्यंत सर्व काही सोपे

मेटाच्या या 'MUSE AI' ची रचना अशा कामांसाठी करण्यात आली आहे, ज्यामध्ये अनेक लहान-मोठे टप्पे असतात. उदाहरणार्थ, विमानाचे किंवा ट्रेनचे तिकीट कधी स्वस्त होणार यावर लक्ष ठेवणे आणि योग्य वेळी बुकिंग करणे, ही कामे हा एजंट सहज करू शकतो. एवढेच नाही, तर जर तुम्हाला ईमेलद्वारे कोणताही डिजिटल फॉर्म आला असेल, तर तो अचूक कसा भरावा आणि त्याची पुढील प्रक्रिया कशी असेल, यातही MUSE मार्गदर्शन करेल. कामांचे योग्य वेळी स्मरण करून देण्यासाठी रिमाइंडर सेट करण्याची सुविधाही यात दिलेली आहे.

खर्चांवर नियंत्रण आणि बचतीचे भन्नाट पर्याय

पैशांचे नियोजन आणि आर्थिक व्यवस्थापनातही हा एआय युजर्सना मोठी मदत करेल. तुमच्या महिन्याच्या खर्चांचे विश्लेषण करून कुठे पैसे वाचवता येतील, याचे पर्याय MUSE शोधून देतो. जर तुम्ही न वापरत असलेल्या अनेक पेड सबस्क्रिप्शन सेवांसाठी पैसे मोजत असाल, तर ते ओळखून ते रद्द करण्याचा सल्ला हा एजंट देईल. मात्र, कोणताही अंतिम व्यवहार किंवा पेमेंटचा निर्णय हा पूर्णपणे युजर्सच्याच हातात असणार आहे.

मोठ्या लक्ष्यांचे (Goals) स्टेप-बाय-स्टेप प्लॅनिंग

फक्त दैनंदिन कामेच नाही, तर तुमचे दीर्घकालीन ध्येय गाठण्यासाठी हा एआय मार्गदर्शक ठरेल. उदा. मॅरेथॉन स्पर्धेची तयारी करणे, डिनर रिझर्व्हेशन करणे किंवा नवीन कार खरेदी करण्यासाठी पैशांचे नियोजन करणे. युजरने फक्त आपले ध्येय त्याला सांगायचे आहे, त्यानंतर ते ध्येय पूर्ण करण्यासाठी काय काय पावले उचलावी लागतील, याचा संपूर्ण आराखडा MUSE तयार करून देईल.

अनेक ॲप्स एकत्र जोडण्याची सुविधा

MUSE चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते इतर अनेक महत्त्वाच्या ॲप्स आणि सेवांशी कनेक्ट होऊ शकते. युजर्स याला जीमेल (Gmail), गूगल कॅलेंडर (Google Calendar), हेल्थ ॲप्स, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि फायनान्सशी संबंधित ॲप्ससोबत लिंक करू शकतात. यामुळे सर्व ॲप्समधील माहिती एकत्र विश्लेषित करून युजर्सना अधिक अचूक आणि वैयक्तिकृत (Personalized) अनुभव देणे MUSE ला शक्य होणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >