उधार घेतलेली बॅट अन् बदललेलं नाव! दुसऱ्या कसोटीपूर्वी ऋषभ पंतने न्यूझीलंडमध्ये खेळला लोकल सामना; VIDEO व्हायरल
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना होणार आहे. हा सामना 27 नोव्हेंबरपासून असून टीम इंडिया विजय मिळवण्यासाठी सज्ज आहे. असं असताना या सामन्यापूर्वी ऋषभ पंत एक लोकल सामना खेळताना दिसला. यावेळी त्याचं नाव पंत नाही तर भलतंच होतं.
November 26, 2026 01:49 PM
उधार घेतलेली बॅट अन् बदललेलं नाव! दुसऱ्या कसोटीपूर्वी ऋषभ पंतचा न्यूझीलंडमध्ये खेळला लोकल सामना; VIDEO व्हायरल (Photo: ANI)
भारत न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना 27 नोव्हेंबरपासून क्राइस्टचर्च येथे सुरू होमार आहे. या सामन्यापूर्वी 25 नोव्हेंबर रोजी भारतीय संघाने सराव करणं टाळलं. खेळाडूंना पुरेसा आराम मिळावा आणि कसोटीत फिट अँड फाईन राहावं यासाठी हा निर्णय घेतला होता. पण असं असताना ऋषभ पंतने एक संधी साधली. ऋषभ पंतने दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी नाव बदलून एक लोकल सामना खेळताना दिसला. 29 वर्षीय ऋषभ पंत 25 नोव्हेंबरला सेंट्रल क्राइस्टचर्चच्या लोकल 'लास्ट मॅन स्टँड'मधील सामन्यात दिसला. या सामन्यात खेळणाऱ्या टीम ओपन हाउस स्विंगर्सकडे एक खेळाडू कमी होता. अशा स्थितीत त्या संघाने पंतला विचारलं की, तू सामना खेळू शकतो का? या प्रश्नानंतर ऋषभ पंतने क्षणाचाही विलंब न करता बॅट उचलली आणि सामना खेळण्यासाठी उतरला. पंतने स्टॅन स्टॅन नावाने क्राइस्टचर्च येथे सामना खेळला. या माध्यमातून न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी फलंदाजी आणि विकेटकीपिंगचा सराव केला.
ऋषभ पंत हा सामना कसा खेळला?
ओपन हाउस स्विंगर्सचा खेळाडू मोहम्मद सफीने न्यूझीलंड हेराल्डला सांगितलं की, पंतला एका इलेक्ट्रिक बाइकवर फिरताना पाहिलं. सफीने सांगितलं की, मी तिथे गेलो आणि त्याला थांबवलं. त्याच्याशी चर्चा सुरू केली आणि काही फोटो घेतले. त्यानंतर मी त्याला विचारलं की तू आमच्यासाठी क्रिकेट खेळू शकतो का? त्यावर त्याने लगेच होकार दिला. सफीच्या मते, पंतने त्याला सांगितलं की ठीक आहे. मी तुमच्यासाठी खेळायला येईल. मग तो आला आणि पॅड घातले आणि काही षटकार मारले.
Open House Swingers were a player short for their match in Christchurch.
Then a mystery player scored 50 in 21 balls on his debut and finished with 72 runs off 26 balls. https://t.co/92SPM75b2g
— RP17 Gang™ (@RP17Gang) November 25, 2026
भारत 'ए' संघाने युएईला पराभूत करून एसीसी मेन्स रायझिंग स्टार्स आशिया कपच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. नेपाळ आणि युएईला पराभवाची धूळ चारत भारताने ...
पंतने 21 चेंडूत ठोकल्या 54 धावा
ऋषभ पंतने हॅगली पार्कमध्ये द चोजन वन्सविरुद्ध ओपन हाउस स्विंगर्ससाठी सामना खेळला. हे मैदाने हॅगली ओव्हलच्या बरोबर बाजूला आहे. याच ठिकाणी ऋषभ पंत दुसरा कसोटी सामना खेळणार आहे. सामन्याच्या स्कोअरबोर्डवर ऋषभ पंतचं नाव स्टॅन स्टॅन असं होतं. त्याने या सामन्यात 21 चेंडूत 54 धावा केल्या. यासह त्याने फॉर्मात असल्याचं दाखवून दिलं.