Nana Patekar Movie: नाना पाटेकरांच्या 'या' चित्रपटाचा आलेला हॉलिवूड रिमेक

हॉलिवूड मधील चित्रपटांचे बॉलिवूडमध्ये अनेक रिमेक झालेले आहेत. बॉलिवूडमधील काही चित्रपट हे हॉलिवूडच्या चित्रपटांच्या कथांशी निगडित असलेल्या पाहायला मिळतात. पण हॉलिवूडने एखाद्या हिंदी चित्रपटाचा रिमेक बनवणे ही एक दुर्मिळ गोष्ट आहे. पण २०१५ मध्ये हे घडले आणि तेही त्या चित्रपटाच्या बाबतीत ज्या चित्रपटाने ८० च्या दशकात नाना पाटेकर यांना प्रसिद्धी मिळवून दिली होती. आज ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या आठवणींना उजाळा देताना हॉलिवूडने रिमेक केलेल्या त्यांच्या या हिंदी सिनेमाची आठवण करणे महत्त्वाचे आहे.


१९८९ मध्ये विधू विनोद चोप्रा यांनी दिग्दर्शन केलेला 'परिंदा' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटली आला होता. या चित्रपटात अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफ यांनी अण्णाची भूमिका साकारलेल्या नाना पाटेकरांच्या हाताखाली राहणाऱ्या आणि काम करणाऱ्या भावांची भूमिका साकारली होती. माधुरी दीक्षित देखील या चित्रपटामध्ये पारोची भूमिका साकारली होती. हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरला तसेच त्याचे संगीत देखील लोकप्रिय झाले. या चित्रपटाने दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकले. तसेच पाच फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आणि १९९० मध्ये सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपटासाठीच्या अकादमी पुरस्काराकरिता भारताची अधिकृत निवड ठरला. नाना पाटेकर यांना या चित्रपटासाठी त्यांचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.



याच चित्रपटासाठी त्यानं त्यांचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. विधू विनोद चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेला परिंदा या चित्रपटाचा पहिल्यांदा तमिळ भाषेत रिमेक करण्यात आला. 'आसाई थंबी' या नावाने १९९८ मध्ये हा रिमेक करण्यात आला. २०१२ मध्ये विधू विनोद चोप्रा यांनी हॉलिवूडमध्ये सिनेमाचा रिमेक येत असल्याची घोषणा केली. त्यांनी सांगितले होते की, ते हॉलिवूडच्या कलाकारांना एकत्र घेऊन अमेरिकन प्रेक्षकांसाठी हा चित्रपट रूपांतरित करणार आहेत. त्यानंतर २०१५ मध्ये 'ब्रोकन हॉर्सेस' हॉलिवूडचा हा चित्रपट प्रदर्शित झाला. अँटोन येलचिन आणि ख्रिस मार्क्वेट यांना दोन मुख्य भूमिकांसाठी निवडण्यात आले, तर व्हिन्सेंट डी'ओनोफ्रिओ यांनी ज्युलियस हेंच म्हणजेच या चित्रपटातील 'ॲना'ची भूमिका साकारली. रिलायन्स एंटरटेनमेंट आणि फॉक्स स्टार स्टुडिओ यांनी जगभरात चित्रपटाची निर्मिती आणि वितरणाची जबाबदारी स्वीकारली.

Comments
Add Comment

Nana Patekar: निधनानंतरही चाहत्यांना नाना पाटेकर रुपेरी पडद्यावर पाहता येणार, कसं काय? ते जाणून घ्या

मुंबई: ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर यांचं वयाच्या 75 व्या वर्षी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले

Nana Patekar Wife: नाटकादरम्यानचं प्रेम, 35 वर्षे वेगळे राहिले; पण केव्हाच वेगळे नाही झाले, कोण आहे नाना पाटेकरांची पत्नी

मुंबई: बॉलिवूड आणि मराठी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध सेलिब्रिटींमध्ये दिवंगत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर

'मी आज आहे उद्या नसेन...' गोव्यातील कार्यक्रमातील नाना पाटेकर यांचे 'ते' शेवटचे भाषण व्हायरल

मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या 'त्या' 3 भूमिका अन् 3 नॅशनल अवॉर्ड्स!

नाना पाटेकर आणि 3 राष्ट्रीय पुरस्कार... डॉन ते संशयी पती! 'त्या' 3 भूमिकांचा थरार तुम्हाला माहितीये का? मुंबई :

Nana Patekar passes away : नानांच्या जाण्याने सिनेसृष्टी हळहळली; बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांकडून श्रद्धांजली

Nana Patekar passes away :  हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने सिनेसृष्टीला मोठा धक्का

Nana Patekar : 'आपला माणूस' हरपला! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर काळाच्या पडद्याआड

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 75व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.