पुणे: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गुरूवारी पहाटे गोव्यामध्ये निधन झाले. गोव्यातील डोना पाऊलमधील राहत्या घरी नानांनी अखेरचा श्वास घेतला. पहाटे हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. पण रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. नानांची अनाकलनीय एक्झिट सर्वांच्याच मनाला चटका लावून गेली. नाना पाटेकर यांनी मृत्यूनंतर माझे अंत्यसंस्कार मूळ गावी शेतात करावं, अशी इच्छा अनेकदा बोलून दाखवली होती. त्यांची शेवटची इच्छा म्हणून नानांवर रात्री पुण्यातील त्यांचं मूळ गाव असलेल्या डोणजे गावामध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले गेले. नानांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी राज्यातील प्रमुख राजकीय नेत्यांसह अनेक मराठी सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यासह अनेक राजकीय नेते नानांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी पुण्यामध्ये दाखल झाले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नानांच्या पार्थिवाचे दर्शन पुणे विमानतळावर दर्शन घेतले. यावेळी एक घडलेला भावुक क्षण मनाला वेदना करून गेला. मुख्यमंत्री अखेरच्या दर्शनासाठी आले, तेव्हा त्यांना बिलगुन मल्हार पाटेकर ढसाढसा रडला. यावेळी उपस्थितांच्या डोळ्यातही अश्रू तरळले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दु:खद प्रसंगात पाटेकर कुटुंबीयांचे सांत्वन केलं.
Nana Patekar Funeral Updates : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने मराठी तसेच हिंदी मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. आपल्या दमदार अभिनयाने आणि प्रभावी ...
सरकारी प्रोटोकॉलनुसार त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. अंत्यसंस्कारापूर्वी नानांच्या पार्थिवावर असलेला तिरंगा सन्मानाने त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपुर्द करण्यात आला. सलामी आणि बिगुल वाजवून पोलिसांकडून त्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला. त्यानंतर नाना यांच्या पार्थिवाला त्यांचा मुलगा मल्हार पाटेकर यांनी मुखाग्नी दिला. नानांचं जाणं कोणाचंही मन स्विकारण्यासाठी तयार नव्हतं. त्यामुळे त्यांचं अखेर दर्शन घेण्यासाठी जनसागर लोटला होता. यावेळी चाहत्यांनी आणि त्यांच्या प्रेम करणाऱ्या प्रत्येकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी जनमानसात एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. त्यांची समाजासोबत घट्ट नाळ जुळली होती.
मुंबई: ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर यांचं वयाच्या 75 व्या वर्षी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. त्यांनी गोव्यातील डोना पाऊलमधील ...
नाना पाटेकर यांना गोव्यातील डोना पाउला येथील घरी गुरूवारी पहाटे अचानक अस्वस्थ वाटू लागलं. त्यांना बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आलं. मणिपाल रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी सुमारे 45 मिनिटे सीपीआर देण्याचा प्रयत्न केला; मात्र उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने पहाटे त्यांना मृत घोषित करण्यात आलं. पहाटे 5.20 मिनिटांनी नानांनी अखेरचा श्वास घेतला. नाना यांनी बॉलिवूड आणि मराठी अशा दोन्ही चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली. नानांच्या अभिनयाचा फक्त एक सामान्य माणूस नाही तर, अनेक सेलिब्रिटी, दिग्गज नेते मंडळी सुद्धा मोठे चाहते आहेत. नानांच्या अशा अचानक जाण्याने चित्रपटसृष्टीत न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.