Bhusawal Nagpur Express : भुसावळ-नागपूर ‘दादाजी धाम’ एक्स्प्रेसला मंजुरी; बऱ्हाणपूर, खंडवामार्गे धावणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत.  

भुसावळ आणि नागपूरदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. कोविड काळात बंद झालेली भुसावळ-नागपूर दादाजी धाम एक्स्प्रेस पुन्हा सुरू करण्यास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. ही गाडी आता नवीन क्रमांकाने भुसावळ-खंडवा-इटारसी-बैतूल मार्गे धावणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत.






नवीन क्रमांकाने धावणार एक्स्प्रेस


नागपूर-भुसावळ दादाजी धाम एक्स्प्रेस (22111/22112) ही गाडी कोविड काळात बंद करण्यात आली होती. या गाडीमुळे खंडवा, बऱ्हाणपूर, नेपानगर आणि निमाड परिसरातील प्रवाशांना भुसावळ व नागपूरला जाणे सोयीचे होत होते. मात्र, सेवा बंद झाल्यामुळे प्रवाशांना पर्यायी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत होता.


आता रेल्वे मंत्रालयाने या मार्गावर नवीन गाडी सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. या एक्स्प्रेसचे नवीन क्रमांक 11111/11112 असणार आहेत. भुसावळ, खंडवा, इटारसी आणि बैतूलमार्गे ही गाडी नागपूरपर्यंत धावणार आहे.



खासदारांच्या पाठपुराव्याला यश


ही रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी निमाड परिसरातील प्रवासी आणि भाविकांकडून सातत्याने मागणी केली जात होती. खंडवाचे खासदार ज्ञानेश्वर पाटील यांनी 26 जून 2026 रोजी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन या मागणीसंदर्भात निवेदन दिले होते. त्यानंतर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. अखेर रेल्वे मंत्रालयाने या गाडीला मंजुरी दिली.



भाविक, विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांना फायदा


खंडवा येथील दादाजी धाम मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी ही गाडी महत्त्वाची ठरणार आहे. याशिवाय विद्यार्थी, नोकरदार आणि व्यापाऱ्यांनाही भुसावळ-नागपूरदरम्यान थेट रेल्वे प्रवासाची सुविधा मिळणार आहे.


दरम्यान, गाडी सुरू होण्याची निश्चित तारीख, वेळापत्रक आणि स्थानकांवरील थांब्यांची माहिती अद्याप जाहीर झालेली नाही. रेल्वे प्रशासनाकडून याबाबत अधिकृत घोषणा झाल्यानंतर प्रवाशांना प्रवासाचे नियोजन करता येणार आहे.


Comments
Add Comment

Devendra Fadnavis : ...तर अवैध होर्डिंग लावणाऱ्यांच्या पुरस्कार यादीत माझेही नाव टाका !

मुंबई : पुणे शहरातील अवैध होर्डिंग आणि अतिक्रमणांविरोधात महापालिका प्रशासनाने सुरू केलेल्या कारवाईचे

Pune News : पुण्यातील कॅम्प परिसरात बेवारस बॅगमुळे खळबळ, बॉम्बशोधक पथकाची तातडीने धाव

पुणे : पुण्यातील कॅम्प परिसरातील 15 ऑगस्ट चौकाजवळ एका बँकेबाहेर बेवारस बॅग आढळल्याने शुक्रवारी काही काळ घबराट

Illegal Hoardings : पुण्यातील बेकायदा होर्डिंग्जवरील कारवाईचे फडणवीसांकडून कौतुक; म्हणाले, ‘माझ्या नावाचे होर्डिंग लागले तरी कारवाई करा!’

पुणे : पुणे शहरातील अतिक्रमण आणि बेकायदा होर्डिंग्जविरोधात महापालिका प्रशासनाने सुरू केलेल्या कारवाईचे

वाहनांच्या प्रलंबित ई-चलान दंडात २० टक्के सूट

मुंबई : वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रलंबित असलेल्या ई-चलानच्या दंडाची वसुली करण्यासाठी राज्य

जीवघेणा नायलॉन मांजा! यवतमाळमध्ये वृद्धाचा कान तुटून पडला; बंदी असूनही डोर कशी पोहोचली?

यवतमाळ : शहरात नायलॉन मांजामुळे पुन्हा एकदा एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे.

Devendra Fadnavis : जर्मन उद्योगांनी महाराष्ट्रात उत्पादनासह संशोधन केंद्रे उभारावीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

मुंबई : कुशल मनुष्यबळ, वेगाने विस्तारणारी बाजारपेठ आणि विकसित औद्योगिक परिसंस्था यांमुळे महाराष्ट्रात जर्मन