Nana Patekar : महापालिका स्थायी समितीच्या सभेत नानांना नगरसेवकांनी वाहिली श्रध्दांजली

त्याशिवाय नानांची स्वत:चीही संस्था आहे, ज्यामाध्यमातूनही त्यांनी केलेली आहे. परंतु, त्यांनी कधीही त्याची प्रसिध्दी केली नाही. कारण नानांची भावना अशी होती की केलेली मदत कधीही बोलून दाखवायची नाही.

मुंबई (विशेष प्रतिनिधी)


ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गुरुवारी गोव्यात ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. नानाच्या निधनाबाबत महापालिका स्थायी समितीत शोक व्यक्त करण्यात आला. परिंदा चित्रपटापासून नावारुपाला आलेल्या या नायकाने आपल्या अभिनयाने मराठी व हिंदी चित्रपटात आपले आपले स्थान निर्माण करतानाही पडद्याबाहेरही सामाजिक क्षेत्रात नायकाची भूमिका बजावली. त्यामुळे नानांबाबत आपले अनुभव मांडत महापालिकेतील नगरसेवकांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली.


मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीने एक उत्कृष्ठ अभिनेता गमावल्याची भावना व्यक्त करत चित्रपटात काम करत असताना पडद्यामागेही नायकाची भूमिका बजावत नाम फाऊंडेशन आणि त्यांच्या इतर संस्थांच्या माध्यमातून मदत करून खऱ्या अर्थाने सामाजिक क्षेत्रातही नायकाची भूमिका बजावल्याचे त्यांनी सांगत नानांना श्रध्दांजली वाहिली. तर सभागृहनेते गणेश खणकर यांनीही सहानभूती व्यक्त् करत नानांना श्रध्दांजली वाहिली. यावेळी उबाठाचे यशोधर फणसे यांनी अंधेरीत आपल्या प्रभागात राहत होते. त्यामुळे त्यांचा आणि आपला कशाप्रकारे मैत्रीपूर्ण संबंध होता असे जुने प्रसंग आणि अनुभव सांगत त्यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. तर मनसेचे यशवंत किल्लेदार यांनी नानांबाबत श्रध्दांजली मांडताना परिंदा चित्रपटापासून ते प्रसिध्दीत आले. नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून नानांनी दृष्काळग्रस्त गावांतील कुटुंबातील मदत केलीच आहे. पण त्याशिवाय नानांची स्वत:चीही संस्था आहे, ज्यामाध्यमातूनही त्यांनी केलेली आहे. परंतु, त्यांनी कधीही त्याची प्रसिध्दी केली नाही. कारण नानांची भावना अशी होती की केलेली मदत कधीही बोलून दाखवायची नाही. त्यामुळे नानांनी केलेल्या मदतीबाबत आपल्याला कल्पना नसेल. पाणी टंचाई ग्रस्त गावांनाही त्यांनी प्रचंड मदत केलेली आहे,असेही त्यांनी सांगितले.


भाजपच्या शीतल गंभीर यांनी नानांचे जुने घर माझ्याच प्रभागात असून आजही त्यांच्या जुन्या घराशेजारीच माझे कार्यालय आहे. माझे कार्यालयही त्यांच्यामुळेच मला मिळालेले आहे. नानांचे आणि गंभीर कुटुंबांचे घरोब्याचे संबंध आहेत. तसेच आजही बाबांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस ते करत असतात. निवडून आल्यानंतरही नानांनी फोन करून बापाचे नाव राखलंस पोरी असे सांगत माझे अभिनंदन केले होते असाही अनुभव सांगितला. तर काँग्रेसचे अश्रफ आझमी यांनी दीड कोटींची गाडी विकून नानांनी त्यातील प्रत्येक कुटुंबाला १५ हजारांची मदत केल्याचा किस्सा सांगितला. तर माजी महापौर श्रध्दा जाधव यांनी अशोक सराफ यांच्या पेक्षा नानांना कमी मानधन मिळत असायचे सांगत त्यांच्या गरीबीचा अनुभव सांगितला. तसेच त्यांच्या शेतात पिकवलेली भाजी स्वत:पुरते ठेवून उरलेली भाजी घराबाहेर ठेवून इतरांना देण्यात येत होती. तसेच आता स्वत:च्या अंत्यसंस्काराची लाकडेही त्यांनी आधीच बाजुला काढून ठेवली आहेत असेही काही किस्से सांगितले. तर नानांनी अभिनयासोबत सामाजिक जाणीवेतून काम केल्याचे प्रकाश दरेकर यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Sewri Encroachment Removal : शिवडी परिसरातील पदपथांवरील ०७ अनधिकृत दुकाने, १५ तात्पुरते शेडवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) पदपथांवर पादचाऱ्यांना सुलभपणे मार्गक्रमण करता यावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून

Ghatkopar STP Project : घाटकोपर मलजल प्रक्रिया केंद्राचे काम निर्धारित कालावधीत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी केली पाहणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने मुंबई मलनि:सारण प्रकल्पांतर्गत

Municipal Hospitals Digital Payment : महानगरपालिका दवाखाने, आपला दवाखाना येथे डिजिटल पेमेंट सुविधा, अतिरिक्‍त आयुक्त (शहर) प्राजक्ता लवंगारे यांचे निर्देश

मुंबई विशेष प्रतिनिधी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेतील दवाखाने, नागरी आरोग्य केंद्र, हिंदुहृदयसम्राट

Vidyavihar Railway Station : विद्याविहार रेल्वे स्थानकावरील उड्डाणपूल १० ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाहतुकीसाठी सज्ज

मुंबई (विशेष प्रतिनिधी) घाटकोपर परिसरातील पूर्वेकडील रामचंद्र चेंबूरकर मार्ग आणि पश्चिमेकडील लालबहादूर

Gas Leakage : IIT पवईच्या वसतिगृहात गॅस गळती; 2 मुलांसह 5 जण जखमी

मुंबई : पवई येथील आयआयटी परिसरातील वसतिगृह क्रमांक 6 मध्ये गॅस सिलिंडरच्या पाइपमधून गळती झाल्याने भडका

Central Railway: मध्य रेल्वेने लाखो विना तिकीट प्रवाशांकडून करोडो रूपयांचा दंड वसूल

मुंबई: मध्य रेल्वेने विनातिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून कोट्यवधी रूपयांचा दंड वसूल केला आहे. मध्य