Kainchi Dham new rules : केंची धाममध्ये गर्दी नियंत्रणासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय; भाविकांसाठी पूर्वनोंदणी बंधनकारक होणार?

वाढती गर्दी आणि वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नैनिताल जिल्हा प्रशासन लवकरच भाविकांसाठी 'पूर्वनोंदणी' (Pre-registration System) सुरू करण्याच्या तयारीत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ही नोंदणी पद्धत केवळ शनिवार आणि रविवार म्हणजेच विकेंडला लागू केली जाऊ शकते.

नैनिताल : उत्तराखंडमधील प्रसिद्ध आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या 'केंची धाम' (Neem Karoli Baba Ashram) येथे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या भक्तांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. वाढती गर्दी आणि वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नैनिताल जिल्हा प्रशासन लवकरच भाविकांसाठी 'पूर्वनोंदणी' (Pre-registration System) सुरू करण्याच्या तयारीत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ही नोंदणी पद्धत केवळ शनिवार आणि रविवार म्हणजेच विकेंडला लागू केली जाऊ शकते.



गर्दी आणि वाहतूक नियोजनासाठी प्रशासनाचा निर्णय


केंची धाम येथे दररोज हजारो भाविक आणि पर्यटक दर्शनासाठी पोहोचत असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी कुमाऊँ विभागाचे आयुक्त दीपक रावत यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक भागधारक आणि अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. यामध्ये दररोज दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येवर मर्यादा घालण्याचा आणि पूर्वनोंदणी सक्तीची करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. पूर्वनोंदणीमुळे प्रशासनाला दररोज येणाऱ्या भाविकांच्या संख्येचा अंदाज येईल, ज्यामुळे सुरक्षेसह वाहतूक आणि आपत्कालीन व्यवस्थापन करणे सोपे होणार आहे. सध्या केंची धाम येथे जाण्यासाठी कोणत्याही नोंदणीची आवश्यकता नाही.



केंची धामचे धार्मिक महत्त्व


नैनिताल जिल्ह्यातील कुमाऊँ भागात क्षिप्रा नदीच्या काठावर वसलेले हे आश्रम अध्यात्मिक शांततेसाठी प्रसिद्ध आहे. 'केंची' या हिंदी शब्दाचा अर्थ कात्री असा होतो. हे आश्रम ज्या दोन टेकड्यांच्या मध्ये आहे, त्यांचा आकार कात्रीसारखा दिसतो, म्हणूनच या परिसराला केंची धाम असे म्हटले जाते. दरवर्षी आश्रमाच्या स्थापना दिनानिमित्त येथे भव्य भंडारा, भजन आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, ज्यासाठी देशभरातून लाखो भाविक उपस्थित राहतात.



कोण होते नीम करोली बाबा ?


केंची धाम आश्रमाची स्थापना १९६४ मध्ये पूज्य नीम करोली बाबा यांनी केली होती. नीम करोली बाबा हे भारतातील महान आणि लोकप्रिय संतांपैकी एक मानले जातात. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील अकबरपूर येथे झाला असून त्यांचे मूळ नाव लक्ष्मी नारायण शर्मा होते. वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी विवाह झाल्यानंतर, १९५८ मध्ये त्यांनी गृहत्याग केला आणि साधू म्हणून जीवन व्यतीत करण्यास सुरुवात केली. निष्काम सेवा, प्रेम आणि भक्तीचा संदेश देणाऱ्या या संताचे सप्टेंबर १९७३ मध्ये वृंदावन येथे निधन झाले, जिथे त्यांचे समाधी मंदिर उभारण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Ducati DesertX V2 भारतात लॉन्च ; दमदार 890cc इंजिनसह मिळणार भन्नाट फीचर्स

Ducati DesertX V2 : भारतीय प्रीमियम बाईक बाजारात Ducati ने आपली नवी अ‍ॅडव्हेंचर बाईक लॉन्च केली आहे. कंपनीने दुसऱ्या जनरेशनची Ducati

दक्षिणेत पावसाचा तडाखा, उत्तरेत दाट धुक्याचा कहर! हवामान विभागाचा खळबळजनक इशारा; 50 किमी ताशी वेगाने वारे वाहणार

नवी दिल्ली : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल होण्याची चिन्हे दिसत असून, भारतीय हवामान विभागाने 27 नोव्हेंबर

पश्चिम बंगालमधील सर्व शाळांमध्ये बायोमेट्रिक हजेरी; 2 जानेवारीपासून अंमलबजावणी

पश्चिम बंगाल सरकारने राज्यातील सर्व सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक

Delimitation : मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी; सर्व राज्यांत 50 टक्के जागा वाढणार

दिल्ली : लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेबाबत केंद्र सरकारने राजकीय पक्षांशी चर्चा सुरू केली आहे.

200 कोटींचा खेळ आणि 3 शहरांत पहाटेच धडक! महादेव सट्टा प्रकरणात ED ची मोठी छापेमारी; खळबळ उडवणारे धागेदोरे समोर

रायपूर : छत्तीसगडमध्ये सक्तवसुली संचालनालयाने (ED) शुक्रवारी सकाळी मोठी कारवाई करत राजधानी रायपूरसह भिलाई आणि

BSF : भारत-पाक सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न फसला; बीएसएफच्या गोळीबारात एक ठार

भारत-पाकिस्तान सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या एका पाकिस्तानी नागरिकाला सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानांनी