Friday, October 9, 2026

Nitesh Rane : आंध्र प्रदेशातील कोळंबी प्रक्रिया केंद्राची मंत्री नितेश राणे यांच्याकडून पाहणी!

1/10 आंध्र प्रदेशातील रायालम-भीमावरम येथे कोळंबी प्रक्रिया उद्योगांची पाहणी करताना महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे.

2/10 जगदीश मरीन एक्सपोर्ट्स आणि मौर्य ॲक्वेक्सला भेट देऊन जागतिक दर्जाच्या कोळंबी प्रक्रिया आणि निर्यात व्यवस्थापनाचा आढावा. 3/10 कोळंबी दीर्घकाळ ताजी ठेवणाऱ्या अत्याधुनिक 'IQF' (Individually Quick Frozen) आणि ब्लॉक फ्रीझिंग तंत्रज्ञानाची माहिती घेताना मंत्री नितेश राणे. 4/10 कच्च्या मालाची हाताळणी, कोळंबीची अचूक प्रतवारी, सोलणे आणि स्वच्छ करण्याच्या आधुनिक पद्धतींची बारकाईने पाहणी.

 

5/10 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील उच्च गुणवत्ता मानके, अन्नसुरक्षा नियम आणि निर्यातक्षम उत्पादनांच्या निर्मितीची सविस्तर माहिती घेताना. 6/10 शीतसाखळी व्यवस्थापन (Cold Chain Management) आणि गुणवत्ता नियंत्रण प्रणाली कशा प्रकारे कार्यरत आहे, याचा सखोल अभ्यास. 7/10 शिजवलेली (Cooked) आणि ब्लँच केलेली (Blanched) समुद्री उत्पादने तयार करण्याच्या प्रक्रियेचा प्रत्यक्ष आढावा घेताना मंत्री नितेश राणे. 8/10 महाराष्ट्रातील समुद्री खाद्यप्रक्रिया उद्योग अधिक सक्षम आणि जागतिक दर्जाचा बनवण्यासाठी आयोजित केलेला विशेष अभ्यास दौरा. 9/10 महाराष्ट्रातील मच्छीमारांना जागतिक बाजारपेठेच्या नव्या संधी मिळवून देणे आणि मत्स्य निर्यातीला मोठी चालना देण्याचा संकल्प. 10/10 जागतिक बाजारपेठेच्या मागणीनुसार कोळंबीवर प्रक्रिया करून निर्यात वाढवण्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करताना मंत्री नितेश राणे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >